आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनने लावलेले आरोप मूर्खपणाचे, लवकरच धडा शिकवला जाईल; पुतिन यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन / मॉस्को - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या देशातील 23 रशियन उच्चायुक्तांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. डबल एजंट गुप्तहेर सेरजी स्क्रिपल आणि त्याच्या मुलीला रशियानेच विष दिल्याचे आरोप लावत ब्रिटनने ही कारवाई केली. एवढेच नव्हे, तर रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंधांसाठी अमेरिकेच्या मदतीने संयुक्त राष्ट्रात दबाव टाकण्यासही सुरुवात केली. त्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटनने लावलेले आरोप हे वेडसरपणाचे लक्षण आहे. त्यांच्या कारवाईस रशिया तातडीने जशास तसे उत्तर देईन असे पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. 

 

असे आहे प्रकरण...

- उल्लेखनीय बाब म्हणजे, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दोन दिवसांपूर्वी संसदेत बोलताना डबल एजंटवर हल्ल्यासाठी रशियावर आरोप लावले. तसेच रशियाला याचे उत्तर देण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली होती. 
- ती मुदत संपताच त्यांनी आपल्या देशातील 23 रशियन उच्चायुक्तांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू केले. 
- त्याच कारवाईनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रवक्त्याने बदला घेणार असल्याचे स्पष्ट केले. अर्थातच रशिया सुद्धा ब्रिटनचे उच्यायुक्त मायदेशी पाठवणार असे चित्र आहे. 

 

कोण आहे स्क्रिपल..?
ब्रिटनच्या विल्टशायर रुग्णालयात एक 66 वर्षीय गुप्तहेर आणि त्याची मुलगी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. या दोघांवरही विष प्रयोग करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे नाव कर्नल सेरजी स्क्रिपल असून तो एक रशियन गुप्तहेर होता. रशियाचा गुप्तहेर असतानाही त्याने ब्रिटनसाठी रशियाचीच हेरगिरी केली होती. रशियात कैद झाल्यानंतर त्याला ब्रिटनमध्ये करार करून आणण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. काही दिवसांतच कार अपघातातच मुलाचा मृत्यू झाला. आता या माजी एजंटवरच विष प्रयोग करण्यात आला आहे. डबल एजंट म्हणूनही कुप्रसिद्ध झालेल्या सेरजीची संपूर्ण कहाणी आज आम्ही घेऊन आलो आहे.

बातम्या आणखी आहेत...