आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीला वैतागली होती, आता जग फिरुन फक्त योगा करते ही तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 24 वर्षीय तरुणी एकॅटरीना टेरेनीना गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसह रशियात राहत होती. पण, नोकरीत तिचे मन कधीच लागले नाही. अमेरिकेत जाऊन काम करणे आणि स्थायिक होणे तिचे स्वप्न होते. पण, व्हिसा मिळाला नसल्याने तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यानंतर तिने सुट्टी घालवण्यासाठी आपल्याला अनोळखी असलेला देश नेपाळला जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तिला योगाचे महत्व कळाले. नेपाळमध्ये राहूनच तिने 200 तासांच्या योगासनाचा क्लास केला. तेव्हापासूनच तिने यानंतर ती आपल्या देशात परतलीच नाही. 

 

गेल्या कित्येक महिन्यांपासून ती नेपाळ, थायलंड, इटली, स्पेन आणि मॉन्टेनिग्रोसह विविध देशांचे दौरे करत आहे. ती कुठल्याही देशात असली तरीही दररोज योगाचे एक आसन आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आहे. तिचे योगासन लोकांनाही खूप आवडत आहे. इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या जवळपास 12 हजार झाली असून दिवसेंदिवस वाढत आहे. योगाचे वेड लागल्यानंतर एकॅटरीनाने लोकांनाही योगाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, एकॅटरीनाच्या योगासनांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...