आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 6 हजारांत खरेदी केल्या जातात व्हर्जिन वधू, माजी सैनिकाचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचा भाडोत्री सैनिक आपल्या पत्नी आणि मुलीसोबत... - Divya Marathi
रशियाचा भाडोत्री सैनिक आपल्या पत्नी आणि मुलीसोबत...

दमास्कस - सीरियात जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना ISIS विरोधात लपून संघर्ष करणारे भाडोत्री रशियन सैनिक स्वतःसाठी पार्टनर विकत घेत आहेत. सीरियात भाडे तत्वावर दहशतवाद विरोधी लढा देणाऱ्या रशियाच्या माजी सैनिकाने हा खुलासा केला आहे. हे सैनिक आपले शारीरिक सुख मिळवण्यासाठी पार्टनर म्हणून सीरियातील अल्पवयीन आणि कुमारी मुलींचा शोध घेतात. केवळ 75 पाउंड अर्थात 6000 रुपयांच्या बदल्यात त्यांची खरेदी केली जाते. रशियाने मात्र, आपला एकही भाडोत्री सैनिक सीरियात तैनात असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. 

>> माजी रशियन सैनिक सेरजीने सांगितल्याप्रमाणे, सीरियात रिकामा मानसिक ताण कमी करण्यासाठी तसेच आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी रशियाचे भाडोत्री सैनिक सीरियातील अल्पवयीन मुलींचा शोध घेतात. त्यांना विकत घेऊन पत्नीप्रमाणे ठेवतात. 
>> वर्षभर खरेदी करण्यासाठी 6 हजार रुपये आणि आयुष्यभर ठेवण्यासाठी 1 लाख रुपये अशी किंमत मोजली जाते.  
>> सेरजी युक्रेनच्या दोनेत्स्क येथील रहिवासी आहे. त्याने रशियासाठी आधी युक्रेन आणि त्यानंतर सीरियात भाडे तत्वावर ड्युटी केली आहे. 
>> भाडे तत्वावर घेतल्या जाणाऱ्या सैनिकांना काहीच अस्तित्व नसते. त्यांना रशियाच्या सैन्य दलातील सैनिकांची किंवा अधिकाऱ्यांची भेट घेण्याची परवानगी सुद्धा नाही. 
>> अशात एकटेपणा दूर करण्यासाठी ते सीरियातील उद्ध्वस्त कुटुंबातून मुली खरेदी करून त्यांना पार्टनर म्हणून ठेवले जाते. दहशतवाद आणि यादवीमुळे बरबाद झालेल्या कुटुंबांत कमाईचे साधन नाही. त्यामुळे, मुलींची विक्री येथे रोजचे चित्र बनले आहे. 
>> अशा प्रकारे मुली खरेदी करताना कुटुंबीय आणि भाडोत्री सैनिक कागदांवर करारनामा देथील करतात. तसेच सैनिक सुद्धा तिची काळजी घेतो का हे पाहिले जाते.

 

भाडोत्री सैनिकांचे असे आयुष्य...
- सेरजीने सांगितल्याप्रमाणे, खासगी मिलिट्री अर्थात भाडे तत्वावर बोलावण्यात आलेले सैनिक युद्धात मेल्यानंतरही त्यांना शहीदाचा दर्जा किंवा कुठलेही सन्मान दिले जात नाही. 
- अनेकवेळा एखादा कंत्राटी सैनिक कठिण परिस्थितींमध्ये अडकल्यास त्याची लष्कराकडून मदत सुद्धा केली जात नाही. युद्धभूमीवर मरण आल्यास घरचे मंडळी बॉडी सुद्धा मागवत नाही. कारण, तो महागडा खर्चही कुटुंबियांनाच द्यावा लागतो. 
- त्यामुळे, हे सैनिक कुठेही गेल्यास त्यांच्या मनात देशभक्तीची भावना राहत नाही. केवळ पगार हातात येईल या अपेक्षाने ते युद्धात जातात. 
- माजी सैनिकाने सांगितल्याप्रमाणे, आयएसच्या एका दहशतवाद्याला ठार मारल्यास त्यांना जवळपास 1000 रुपये दिले जातात. - या सैनिकांची भरती देखील खोटे बोलून केली जाते. बऱ्याचवेळा कंत्राट देणारी कंपनी जास्त पैसा घेऊन सैनिकांच्या हातात काहीच पडू देत नाही. 
- त्यातही कुटुंबियांना पाठवल्या जाणाऱ्या स्थळी घेऊन जाण्याची परवानगी नाही. आपण कुठे तैनात केले जात आहोत हे सुद्धा कुटुंबियांना सांगितले जात नाही. सीरियात रशियाच्या अशा दोन प्रायव्हेट कंपन्या काम करत आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज आणि इतर महत्वाचे तथ्य...
 

बातम्या आणखी आहेत...