आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगचेे ली जाए यांना 12 वर्षे कैदेची मागणी; राजकीय अपहारात ली जाए आरोपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- दक्षिण कोरियाच्या सरकारी वकिलाने सॅमसंग कंपनीचे तुरुंगात असलेले वारस ली जाए याँग यांच्या तुरुंगवासात १२ वर्षांनी वाढ करण्याची मागणी केली आहे. ली जाअ याँग सध्या लाच आणि इतर आर्थिक अपहारप्रकरणी तुरुंगात आहेत. सेऊल न्यायालयात त्यांच्या सुटकेच्या अपिलाची सुनावणी झाली. मात्र सरकारी वकिलाने त्यांना १२ वर्षांचा तुरुंगवास सुनावण्याची मागणी केली आहे.  


ऑगस्टमध्ये कनिष्ठ न्यायालयाने ली यांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून हे यांना त्यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. पार्क यांचे ली जाए याँग हे विश्वासू होते. सेऊल उच्च न्यायालयात सध्या हा खटला सुरू आहे. उच्च न्यायालय येत्या महिन्यात यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ली आणि आरोपी पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यताही आहे. 


माजी राष्ट्राध्यक्षा पार्क यांनी दक्षिण कोरियातील आघाडीच्या उद्योजकांना ६८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निधी देण्याचा आग्रह केला होता. त्यांची मैत्रीण चोई सून सील यांच्या ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांसाठी हा निधी वर्ग करण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता.  

 

राजकीय अपहारात ली जाए आरोपी

सॅमसंगचे वारस ली जाए याँग यांनी माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून यांना लाच दिल्याने हे प्रकरण राजकीयदृष्ट्या हाताळले जात आहे. मार्चमध्ये पार्क यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांची मैत्रीण चोई सून सील यांना त्यांनी घटनात्मक अधिकार दिल्याने जनतेमध्ये अंसतोष होता. शिवाय अब्जावधींची लाच या दोघींनी स्वीकारली होती. त्यामुळे ली जाए याँग यांचे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे आहे. सॅमसंग कंपनीवर एकहाती वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी लाच दिल्याचे चौकशीत आढळले. 

बातम्या आणखी आहेत...