आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाचे सर्वात धनाढ्य प्रिन्स अल वलीद बिन तलाल यांना आता हॉटेलातून जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या सुटकेच्या बदल्यात 6,358 रुपये अदा करण्यास नकार दिला आहे. तत्पूर्वी तलाल यांनी रियाधच्या रिट्झ कार्टन हॉटेलमध्ये नजरैकेदेत ठेवण्यात आले होते. सौदीत भ्रष्टाचार प्रकरणी 200 वरिष्ठ अधिकारी आणि प्रिन्सवर कारवाई करण्यात आली. तलाल त्यापैकीच एक आहेत.
आलीशान जेलमध्ये मिळतात अशा सुविधा...
> या तुरुंगात येणाऱ्या कैद्यांना आप-आपल्या खासगी खोल्यांचे अगदी हॉटेलच्या रूम्सप्रमाणे की-कार्ड दिले जातात. या रूममध्ये त्यांना एका किंग साइज बेडसह सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.
> सौदी अरेबियातील अतीदक्ष तुरुंगातील खोल्या अगदी हॉटेलप्रमाणेच असतात. त्यामध्ये राहणाऱ्यांना तीन वेळचे जेवण दिले जाते.
> या तुरुंगाला फॅमिली हाऊस देखील म्हटले जाते. यामध्ये कैद्यांना सुधारण्याचे प्रयत्न केले जातात.
> सौदी अरेबियाच्या सुविधांनी सुसज्ज अशा 5 तुरुंगांपैकी एक असलेल्या अल-हायरमध्ये दहशतवादाशी संबंधित 5000 हून अधिक कैदी आहेत.
> वाळवंटी किनाऱ्यावर असलेल्या या तुरुंगाभोवती उंच-उंच भिंतींची तटबंदी आहे. या तुरुंगाच्या सभोवताल आणि गेटवर मोठ्या संख्येत गार्ड उभे असतात.
> भेटण्यासाठी बायको किंवा कुटुंब आल्यास कैद्यांना त्यापेक्षा मोठी रूम काऊच आणि टेबलसह दिली जाते.
> कमी गंभीर गुन्हेगारी प्रकरणी कैदेत असलेल्यांना वाइफ भेटायला आल्यास त्यांना विशेष पिंक रूम दिली जाते. त्या ठिकाणी ते एकटे वेळ घालू शकतात.
दरमहा मानधन
> संरक्षण अधिकारी अबु नसेफ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, येथे राहणाऱ्या कैद्यांना दरमहा 400 (25600 भारतीय रुपये) अमेरिकन डॉलर मानधन दिले जाते.
> या व्यतीरिक्त कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी आणि त्यांना गिफ्ट देण्यासाठी 2666 (जवळपास पावणे दोन लाख रुपये) अमेरिकन डॉलर दिले जातात.
दहशवाद्यांचे सुधारगृह
> सौदी अरबच्या या तुरुंगात त्याच दहशतवाद्यांना जागा दिली जाते जे सौदीचे नागरिक होते आणि ज्यांनी सौदी वगळता दुसऱ्या देशांमध्ये दहशत पसरवली.
> देशाबाहेर दहशतवादी कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांचे विचार बदलणयासाठी त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांना या तुरुंगात ठेवले जाते. सौदी विरोधात देशद्रोह किंवा दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना येथे ठेवले जात नाही.
पुढील स्लाइड्सवर या लग्जरी तुरुंगाचे Inside Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.