आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Third Wife ने लावले बलात्काराचे आरोप; दुसऱ्या पत्नीने केला पतीचा बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या एका सौदी अरेबियाच्या नागरिकावर त्याच्या तिसऱ्या पत्नीने बलात्काराचे आरोप लावले आहेत. दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या खटल्याची बुधवारी सुनावणी झाली. त्यामध्ये पत्नीने आपबिती कोर्टात मांडली. तिने सांगितल्याप्रमाणे, आरोपीने तिला इतके घट्ट बांधले होते की तिला हालताही येत नव्हते. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तो नेहमीच आपल्यावर अत्याचार करून जिवे मारण्याच्या धमक्या द्यायचा असेही तिने कोर्टात सांगितले आहे. युवकाने मात्र तिचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. 


असे आहे प्रकरण...
- इंग्लंडच्या हल सिटीमध्ये 36 वर्षीय आरोपी शदी हा हल विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये पीएचडी करत आहे. वकील शटलॉट बॅनिस यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, शदीच्या एका शेजाऱ्याने त्याला आपल्या पत्नीमागे रागात धावताना पाहिले होते. त्यानेच पोलिसांना बोलावले आणि शदीला अटक झाली. 
- शदीच्या पत्नीने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, तिचा पती शदी तिच्यावर बळजबरी आणि बलात्कार करायचा. ती सौदी अरेबियाची नाही म्हणूनच तो वारंवार तिला हीन वागणूक देऊन अत्याचार करत होता असे तिने कोर्टात सांगितले. 
- पीडितेने सांगितले, की तिला आरोपीने पलंगाशी बेल्टने बांधले होते. तिला हालताही येत नव्हते. अशाच अवस्थेत त्याने पीडितेवर बलात्कार केला. वाट्टेल तेव्हा तो अत्याचार, मारहाण आणि शिवीगाळ करायचा असे आरोपही तिने लावले आहेत. 
- शदीला यासंदर्भात पोलिसांनी विचारले असता त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट, त्या महिलेला मुस्लिमांविषयी घृणा वाटते, त्यामुळे मुद्दाम तिने खोटे आरोप लावले असा आरोप त्याने लावला आहे. सोबतच, कोर्टाने आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सुद्धा त्याने केली. 


दुसऱ्या पत्नीने केला बचाव
- आरोपीच्या इतर दोन पत्न्या सौदी अरेबियात राहतात. त्यापैकी दुसऱ्या पत्नीने शदीचे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे, तर ती शदीच्या बचावात सुद्धा उतरली आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, शदीची तिसरी पत्नी आपल्या पतीला अडकवण्यासाठी मुद्दाम खोटे आरोप लावत आहे. शदीने आपल्यासोबत कधीही वाइट व्यवहार केलेला नाही. तिसऱ्या पत्नीचे आरोप सर्रास खोटे आहेत. 
- तिने पुढे सांगितले, की एका पब्लिक पार्कमध्ये शदी आणि त्याची तिसरी पत्नी होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला आणि तिने आपल्या दोन मित्रांना बोलावून पोलिसांना फोन करण्यास सांगितले. तसेच खोटे-नाटे आरोप लावून शदीला अडकवले. तिने हा सगळा कारस्थान आपल्या दोन पुरुष मित्रांच्या मदतीने केला.

बातम्या आणखी आहेत...