आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Driving ची परवानगी मिळाली, पण अजूनही या 10 गोष्टी करू शकत नाही सौदीच्या महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदीच्या महिलांना हळू हळू विविध अधिकार मिळत आहेत. त्यामुळे महिलांना पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद लवकरचत अनुभवता येणार असल्याचे सांगितले जातेय. त्याचाच एक भाग म्हणजे सौदी अरबच्या महिलांनाही ड्रायव्हींगची परवानगी मिळाली आहे. सौदीतील महिलांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. 


सौदीतील महिलांना ड्रायव्हींगचा अधिकार मिळाला ही नक्कीच आनंदाची बाब आहे. कारण आता त्यांना प्रवास करण्यासाठी पूर्णपणे पुरुष सदस्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. पण तसे असले तरी याशिवाय अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या सौदीतील महिलांसाठी स्वप्नवत आहेत. अनेक बाबतीत अजूनही सौदीतील महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे का असा प्रश्न निर्माण होतो. अशाच काही गोष्टींबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

 

1) सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे, सौदीमधील महिलांना अजूनही कुटुंबातील पुरुष पालकाच्या संमतीशिवाय लग्न करण्याची किंवा घटस्फोट देण्याची किंवा स्वीकारण्याचीही परवानगी नाही. 


2) सौदीतील महिलांना बाहेर वावरताना त्यांच्या जवळच्या पुरुष नातेवाईकांशीही फार मोकळेपणाने बोलता किंवा वागता येत नाही, तसे आढळल्यास त्यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो.  


3) येथील महिला बाहेर रेस्तरॉमध्ये जेवण करू शकत नाहीत. कारण त्याठिकाणी स्वतंत्र असे फॅमिली सेक्शन नसते. 


4) महिलांना सार्वजनिक ठिकाणी अबाया (डोक्यापासून पायापर्यंत झाकणारे कपडे) परिधान करणे गरजेचे असते. पण रियादमध्ये काही ठिकाणी महिलांनी चेहरे उघडे ठेवायला सुरुवात केली आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, सौदीतील महिलांवर असलेली इतर बंधने...

बातम्या आणखी आहेत...