आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनेशनल डेस्क - लिबीयामध्ये 40 वर्षांपासून काळ राज्य करणारा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीने 1 सप्टेंबर 1969 ला देशाची सुत्रे हाती घेतली होती. सुमारे 40 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये आखाती देशांमध्ये राजकीय क्रांती घडल्या, ज्यात गद्दाफीच्या साम्राज्यालाही तडे गेले. या आंदोलनादरम्यानच ऑक्टोबरमध्ये एका हल्ल्यात गद्दाफी मारला गेला आणि लिबियामध्ये
हुकूमशाहीचा अंत झाला.
शाळेत जाऊन निवडायचा मुली..
गद्दाफीच्या अय्याशीच्या अनेक कथा 'गद्दाफीज हरम' नावाच्या एका पुस्तकात आहेत. हे पुस्तक अॅनिक कोजियानने लिहिले आहे. गद्दाफीच्या मृत्यूनंतर अॅनिक कोजियानने गद्दाफीच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक तरुणींची भेट घेतली होती. कोजियान लिहिते, की गद्दाफी नेहमी मुलींवर अत्याचार करायचा. त्यासाठी तो नेहमी शाळा कॉलेजेसमध्ये जायचा. त्यावेळी त्याला जी मुलगी आवडेल तिच्या डोक्यावर तो हात ठेवायचा. गद्दाफीचे सैनिक हा इशारा समजून त्या मुलीला गद्दाफीसमोर हजर करायचे. तिच्या कुटुंबीयांनाही काही बोलता येत नव्हते. अन्यता त्यांचा मृत्यू होणे ठरलेलेच होते. अशा प्रकारे गद्दाफीने शेकडो तरुणींवर बलात्कार केला, त्यांचे वय 14 पेक्षाही कमी होते.
मुलींना ठेवले जायचे सिक्रेट तळघरांत
त्रिपोली युनिव्हर्सिटी आणि इतर अनेक ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सिक्रेट तळघरांत शाळा आणि कॉलेजेसमधून अपहरण केलेल्या व्हर्जिन तरुणींना ठेवले जायचे. बीबीसी 4 च्या एका डॉक्युमेंटरीमध्ये गद्दाफी यांच्या गुप्त ठिकाणांचे फोटो प्रसिद्ध केले होते. गद्दाफीच्या मृत्यूनंतर अमेरिकन लष्कराने त्याचे अनेक सिकेट तळघरं शोधली होती. त्यातून शेकडो मुली मिळाल्या होत्या. त्यापैकी बहुतांश मुली विद्यार्थिनी होत्या. त्यांना शाळा कॉलेजांतून किडनॅप केले जायचे. या मुलींनी आपबिती सांगितल्यानंतर संपूर्ण लिबियाला हादरा बसला होता.
मुली आणणाऱ्यांना मिळायचे बक्षीस
गद्दाफीचे काही खास वफादार गुर्गे होते. त्यांचे काम लिबीयाच्या शाळा कॉलेजेसमधून टॅलेंट हंटच्या बहाण्याने तरुण मुली निवडणे हेच होते. एवढेच नाही, मुली किडनॅप करून त्यांचे मेडिकल चेकअपही केले जायचे. त्यांना काही आजार तर नाही, हे तपासले जायचे. त्यानंतर त्यांना सजवून गद्दाफीकडे पाठवले जायचे. गद्दाफीला मुलगी आवडली तर तो तिला आणणाऱ्याला बक्षीसही द्यायचा.
मुलींना दाखवायचे पोर्न फिल्म
कोजियानने तिच्या पुस्तकात लिहिले आहे की, गद्दाफीने नव्या मुलींना सेक्स स्लेव्ह बनवण्याचे काम राजदार मुबारका नावाच्या एका महिलेवर सोपवले होते. मुबारका या मुलींना सजवायची. तसेच त्यांना पोर्न चित्रपट दाखवले जायचे. गद्दाफीकडे पाटवल्या जाणाऱ्या मुलींनी त्याला खुश करावे म्हणून त्यांची मानसिक तयारी करण्याचे कामही मुबारकावरच होते. असे करायला नकार देणाऱ्या मुलींना अत्यंत भयावह शिक्षा दिली जायची. सेक्ससाठी हा हुकूमशहा एवढा वेडा होता, की त्याने आजुबाजुला बॉडीगार्डही महिलाच ठेवलेल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गद्दाफीच्या सिक्रेट तळघरांचे PHOTOS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.