आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने Rock ला विचारले शाळेत येशील का, मिळाला इतका मोठा सरप्राइझ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - पाश्चिमात्य देशांमध्ये शाळेत प्रॉम हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. वर्षाच्या शेवटी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन्ही प्रकारच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सुंदर-सुंदर पोशाखांमध्ये आपल्या आवडत्या जोडीदारासोबत या प्रॉमला उपस्थिती लावणे किंवा सेलिब्रिटीला आपला जोडीदार बनवून घेऊन जाणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याच कार्यक्रमासाठी अमेरिकेतील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने चक्क हॉलिवूड स्टार ड्वेन जॉनस उर्फ द रॉकला आपल्या प्रॉमवर बोलावले. त्यावर अॅक्टर आणि WWE चा माजी रेसलर रॉकने तिला जो सरप्राइझ दिला ती आयुष्यभर विसरणार नाही. 


ट्वीटरवरून केली विनंती
मिनेसोटा प्रांतातील स्टिलवॉटर हायस्कूलची विद्यार्थिनी केटी हिने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या आवडत्या सुपरस्टारला प्रॉमसाठी येण्याची विनंती केली. तिने अतिशय क्रिएटिव्ह स्टाइलमध्ये एक बोर्ड तयार करून माझ्या प्रॉमला जोडीदार होशील का असे रॉकला विचारले. हे सांगत असताना तिने आपण किती मोठे फॅन आहोत हे देखील पटवून दिले. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची ड्वेन जॉनसन दखल घेतली. 


पुढे वाचा, वर्गात बसली होती तेव्हा अचानक झाले असे काही...

 

बातम्या आणखी आहेत...