आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एससीओ भारत, पाकिस्तानचे महत्त्व जाणतो : संयुक्त राष्ट्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रे -  भारत आणि पाकिस्तानच्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) प्रवेशामुळे एससीओ त्यांचे महत्त्व जाणत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. संघटनेतील सदस्य देशांच्या विस्तारामुळे प्रादेशिक शांतता व स्थैर्य राखण्यात मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांचे आठसदस्यीय एससीओमध्ये स्वागत केले. मोदी व हुसेन यांनी यावर्षी प्रथमच परिषदेत सहभाग घेतला होता. बीजिंगस्थित एससीओमध्ये दोन्ही देशांना गेल्यावर्षी सदस्यत्व देण्यात आले आहे.  


संयुक्त राष्ट्राच्या उप सरचिटणीस अमिना मोहंमद यांनी १८ व्या एससीओच्या उद््घाटन सत्रात बहुपक्षीयवादाची जगाला आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. भारत व पाकिस्तानच्या प्रवेशामुळे २००१ नंतर प्रथमच संघटनेचा विस्तार झाला आहे. त्यामुळे एससीओने दोन्ही देशांचे महत्त्व जाणले आहे.

 

संघटनेच्या कामामुळे प्रादेशिक शांतता व स्थैर्य राखण्यात मदत मिळेल. तुम्ही अर्ध्या मानवतेचे प्रतिनिधित्व करता तसेच तुम्ही सहकार्य व संवादावर आधारिक जागतिक विषयपत्रिकेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहात, असे मोहंमद यांनी स्पष्ट केले.  सुरक्षा गुन्हेगारी व दहशतवादामुळे निर्माण झालेल्या धोक्याचे निराकरण एकटा देश करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...