आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Moon वर लँड करणारा दुसरा माणूस आज मुलांमुळे रडतोय, सांगितली आपबिती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकन अंतराळवीर आणि चंद्रावर पोहोचलेली दुसरी व्यक्ती बझ आल्ड्रिन (88) यांच्यावर आपल्या मुलांमुळे रडण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपली मुलगी आणि मुलांच्या विरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या खटल्यात आपल्या माजी व्यवस्थापकाचे सुद्धा नाव घेतले आहे. हे तिघे मिळून आपले पैसे चोरतात आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतात अशी तक्रार त्यांनी केली. त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीचे पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर वडिलांनी आता मुलांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. 


काय म्हणाले बझ आल्ड्रिन?
> बझ आल्ड्रिन यांनी आपला धाकटा मुलगा अँड्रीव्ह आल्ड्रिन (60) आणि मुलगी जेनिस (60) हिच्यासह माजी व्यवस्थापक क्रिस्टीना कॉर्प या तिघांना आरोपी केले आहे. 
> या तिघांनी मिळून माझ्या संपत्ती, कंपनी आणि संस्थेवर नियंत्रण मिळवले आहे. सोबतच, माझ्या प्रत्येक हालचालीवर ते नियंत्रण ठेवतात. त्यांनी कोर्टात मी विसरभोळा असल्याचे सांगत एक याचिका सुद्धा दाखल केली. जेणेकरून माझ्या संपत्तीचे सर्व अधिकार त्यांना मिळतील.
> प्रशासन आणि कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक करत या लोकांनी माझ्या अकाउंटमधून कोट्यवधींचा पैसा काढला. याचा वापर माझा मुलगा, मुलगी आणि व्यवस्थापक स्वतःच्या लाइफस्टाइलवर अवाढव्य खर्च करण्यासाठी वापरत आहेत. 
> एवढेच नव्हे, तर या लोकांनी माझ्या आयुष्यावर इतके नियंत्रण मिळवले आहे, की मला लग्न सुद्धा करू देत नाहीत. मला शेवटच्या क्षणांमध्ये विवाह करून अर्धांगिणीसोबत राहायचे आहे. परंतु, हे तिघे मला तसेही करू देत नाहीत. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या मुलाला यात आरोपी केलेले नाही. 
> बझ आल्ड्रिन यांनी लावलेल्या आरोपानुसार, त्यांचा मुलगा आणि मुलगी चंद्रावरून आणलेल्या तसेच अंतराळातील दुर्मिळ वस्तू सुद्धा विकून मोठ्या प्रमाणात कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत.


मुलांनी दिले स्पष्टीकरण
> बझ आल्ड्रिन यांचा धाकटा मुलगा अँड्रीव्ह आणि मुलगी जेनिस यांनी वडिलांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वडिलांना अल्झायमर नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे, ती कुठलीही गोष्ट लवकर विसरून जातात. त्यांच्या लक्षात काहीच राहत नाही.
> त्यांनी घराबाहेर नवीन आणि संशयित मित्रांचा एक गट बनवला आहे. परंतु, ते लोक बझ आल्ड्रिन यांच्या विसरभोळेपणाचा गैरफायदा घेत आहेत. त्यांना वेळोवेळी कुटुंबियांच्या विरोधात भडकावून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
> बझ आल्ड्रिन यांचे बँक अकाउंट डीटेल्स पाहिल्यास त्यांनी या मंडळीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी आपल्या अकाउंटवरून त्या कथित मित्रांच्या अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्यांच्यासाठी महागड्या भेटवस्तू पाठवत आहेत. असेच राहिल्यास त्यामध्ये बझ आल्ड्रिन यांचे मोठे नुकसान होईल. कोर्टाच्या आदेशानुसार, दोन्ही पक्षांचे ऐकूण घेतल्यानंत पुढील आठवड्यात बझ आल्ड्रिन यांची मानसिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.


चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा माणूस
यूएस एअरफोर्समध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले बझ आल्ड्रिन आणि त्यांचे सहकारी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिली मानवी मोहिम फत्ते केली. अॅपोलो 11 मिशन अंतर्गत त्यांनी 1969 मध्ये इतिहास घडवला. यानंतर हे दोघे जगभरात सर्वांचे सुपरहिरो बनले. यानंतर त्यांनी विविध कंपन्या आणि सेवाभावी संस्था सुद्धा स्थापित केल्या. तसेच नासा आणि स्पेस एक्स कंपनीत सल्लागार म्हणूनही काम केले. अमेरिकेच्या टीव्ही शो आणि बिग बँग थ्योरी या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच स्पेस फोर्सची घोषणा केली. त्या बैठकीत उपस्थित मोजक्या महत्वाच्या व्यक्तींमध्ये आल्ड्रिन यांचाही समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...