आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hanged: सुळावर लटकला जपानी भोंदू बाबा, भक्तांवर रेप करून बाटलीत ठेवायचा केस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - स्वतःला ईश्वराचा दूत म्हणवून घेणारा जपानचा कुख्यात भोंदू बाबा शोको असाहारा (63) याला सुळावर लटकवण्यात आले आहे. त्याने 1995 मध्यो टोक्यो मेट्रो स्टेशनवर रासायनिक (Sarin Attack) हल्ला घडवला होता. ओम शिनरिकयोचा संस्थापक असाहारा आंधळा असतानाही आपल्या महिला भक्तांचे लैंगिक शोषण करायचा. प्रत्येक शीष्य आणि आश्रम सदस्याशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर तो तिचे केस बाटलीत ठेवायचा. त्याने आपल्या आश्रमात असंख्य महिला भक्त ठेवल्या. त्यापैकी कुणाचाही विवाह होऊ दिला नाही. जो कुणी बंड पुकारेल त्याचा तो खून करायचा. जपानी माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याला शनिवारी सकाळी फासावर लटकवण्यात आले आहे. 


असा झाला प्रसिद्ध...
चिझुओ मत्सुमोतो या दृष्टीहीन बाबाने 1984 मध्ये ओम शिनकारियो नावाचा पंथ स्थापित केला होता. जपानमध्ये या पंथाला सुप्रीम ट्रूथ नावानेही ओळखले जात होते. पंथाच्या स्थापनेनंतरच त्याने स्वतःचे नाव शोको असाहारा असे ठेवले होते. या समुदायात त्याने प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, बुद्धीजीवी, अभियंते अशा लोकांची भरती केली. यानंतर कट्टरपंथियांची भरती करून त्यांना आणखी कट्टर बनवले. कसे-बसे तो स्थानिक टीव्ही शोंमध्ये यायला लागला. टीव्ही आणि मॅगझीन्समध्ये चेहरा प्रसिद्ध झाल्याने त्याच्या पंथाला सुद्धा प्रसिद्धी मिळाली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोक त्याला भाषणे देण्यासाठी बोलवायला लागले होते. त्याने स्वतःची पुस्तके देखील प्रकाशित केली. 


बाटल्यांमध्ये ठेवायचा महिलांचे केस...
शोको असहाराने सुरुवातीला अनेक चमत्कारांचा दावा केला. भक्तांची संख्या वाढत गेली तशाच त्याच्या आश्रमाच्या चर्चा देखील वाढल्या. आपण चक्क हवेत उडू शकतो असे दावे त्याने केले होते. जपानी मीडियामध्ये तो हास्याचा विषय बनला होता. त्याच दरम्यान एक-एक करून 27 महिले समोर आल्या आणि त्यांनी असहारावर बलात्काराचे आरोप लावले. त्यापैकी 13 आरोप सिद्ध झाले. पोलिसांनी त्याच्या अटकेनंतर आश्रमावर धाड टाकली तेव्हा त्यांना असाहाराची गुप्त खोली सापडली. त्यामध्ये असंख्य काचेच्या बाटल्या आणि त्यामध्ये केस सापडले. त्या प्रत्येक बाटलीवर त्या-त्या महिलांची नावे लिहिण्यात आली होती. असाहाराने आपल्या अनुयायांच्या विवाहावर बंदी लावली होती. त्या सर्व अनुयायांचे तो रोज लैंगिक शोषण करायचा. व्हर्जिन महिलांना तो डाकिनी म्हणायचा. 


रासायनिक हल्ले घडवणारा दृष्टीहीन बाबा
मार्च 1995 मध्ये शोको असहाराच्या कट्टरपंथी अनुयायांनी टोक्यो मेट्रो स्टेशनवर रासायनिक हल्ला केला होता. त्यांनी भर गर्दीत सॅरीन हे घातक वायू सोडले होते. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला. तसेच 6000 हून अधिक लोकांना वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. सुरुवातीला त्याला अटक करण्यात आली तेव्हा या हल्ल्यासाठी आपण नाही तर देव जबाबदार असल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर आपण 1993 मध्ये हेलिकॉप्टरने शहरावर रासायनिक हल्ला करणार होतो अशी कबुली असाहाराने केली. याच प्रकरणात त्याला फासावर लटकवण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...