आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोरँटोत माथेफिरू चालकाने गर्दीला चिरडले;10 जण ठार,15 लोक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरॉन्टो - कॅनडाच्या उत्तर टोरँटोमध्ये २५ वर्षीय व्हॅन चालकाने गर्दीला चिरडले. चालकाने हेतूपुरस्सर हे केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यामध्ये १० जण ठार झाले तर इतर १५ लोक जखमी झाले आहेत. पोलिस प्रमुख मार्क साँडर्स यांनी सांगितले की, व्हॅन चालक अॅलेक मिनासियन याला ताब्यात घेण्यात आले आहे. मिनासियन कोणत्याही दहशतवादी समूहाशी संबंधित नाही,  असे पोलिस सूत्रांनी सांगितले.  त्याने गर्दीवर हल्ला का केला, याचे कारण पोलिसांनी अद्याप उघड केले नाही. टोरँटोचे उपाध्यक्ष पीटर यूएन यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, या घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे.  कॅनडाचे नागरी सुरक्षामंत्री राल्फ गुडले यांनी सांगितले की, सध्या तपास सुरू असून कोणताही निष्कर्ष देण्याची घाई करणे चूक ठरेल. मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मिनासियनने जाणूनबुजून गर्दीमध्ये व्हॅन घुसवली होती.

 

राजधानीत एका व्यक्तीने भरधाव व्हॅन फुटपाथवर असलेल्या गर्दीवर भिडवली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून इतर 15 जण जखमी आहेत. अपघातानंतर व्हॅन ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीचे नाव अॅलेक्स मिनासिएन असून तो 25 वर्षांचा आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने आपल्या डोक्यात गोळ्या घालण्याचे आवाहन केले. तो कुठल्याही दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे पुरावे सापडले नाहीत असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

 

ड्राइव्हरने मुद्दाम हल्ला केला -प्रत्यक्षदर्शी
- टोरॉन्टो येथील याँग स्ट्रीट आणि फिन्च अॅव्हेन्यू परिसरात झालेल्या या भयंकर घटनेत प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की ड्रायव्हरने मुद्दाम गर्दीला लक्ष्य केले. त्याची व्हॅन फुटपाथवर चुकून चढली नाही. एकानंतर एक तो लोकांना आपल्या गाडीने चिरडत होता. 
- घटनास्थळावरच 8 जणांचा जीव गेला. तर ज्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, त्यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक होती. काही मिनिटांतच रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला.
- दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा सर्वत्र रक्ताचा सळा पडला होता. चोहीकडे मृतदेह होते. सोबतच जखमी मदतीसाठी ओरडत होते. 
- शहरातील पोलिस प्रमुख मार्क सॅन्डर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभाग या घटनेचा सविस्तर तपास करत आहे. ड्रायव्हरने लोकांवर हल्ला केला, किंवा मुद्दाम गाडी चढवल्याचे पुरावे सापडले नाहीत. असे त्यांनी सांगितले आहे. 


पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी व्यक्त केले दुख
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाइकांविषयी सांत्वना व्यक्त केली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मदत केली त्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...