आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध हॉलिवूड प्रोड्युसर Harvey Weinstein पोलिसांना शरण; असंख्य अभिनेत्रींचे शोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हॉलिवुडच्या सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक हार्वे वीनस्टीनने अखेर न्यूयॉर्क पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्या विरोधात बलात्कार, लैंगिक शोषण आणि इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेक्स स्कॅन्डलमुळे त्याला ऑस्कर आणि बाफ्टा पुरस्कार समितीने बॅन केला. हॉलिवूडने त्याच्यावर बहिष्कार घातला.       तसेच एकानंतर एक अनेक अभिनेत्रींनी त्याच्या लैंगिक छळांचे खुलासे केले. याच प्रोड्युसरच्या विरोधात #MeToo कॅम्पेन सुरू झाले. जे भारतासह जगभरात लैंगिक छळांविरोधात वाचा फोडणारे सर्वात मोठे सोशल मीडिया कॅम्पेन ठरले. 

 

हॉलिवुडच्या ए लिस्ट अभिनेत्री एंजेलिना जोली, ग्विनेथ पॅल्ट्रोसह अनेक अभिनेत्री त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे आले. तसेच आजही समोर येत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रोड्युसरची ऐश्वर्या रायवर सुद्धा वाइट नजर होती. पण, एका अॅसिस्टंटमुळे ती या नराधमापासून बचावली. 


अशी बचावली ऐश्वर्या राय
>> ऐश्वर्या रायची माजी टॅलेन्ट मॅनेजर असल्याचा दावा करणाऱ्या सिमोन शेफील्ड हिने सांगितल्याप्रमाणे, तिने ऐश्वर्या रायला हार्वे वीनस्टीनपासून वाचवले आहे. 
>> माध्यमांच्या वृत्तानुसार शेफील्ड म्हणाली, "त्यावेळी मी ऐश्वर्या रायची मॅनेजर होते. हॉलिवुड इवेन्टमध्ये हार्वे वीनस्टीन कुठल्याही परिस्थितीत ऐश्वर्याला एकटे भेटण्यासाठी धडपड करत होता. कितीही समजावून सांगितले तरी तो अगदी डुकराप्रमाणे वागत होता. 
>> ऐश्वर्या, मी आणि तो चर्चेसाठी बसलेले असताना त्याने वेळोवेळी मला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, प्रत्येकवेळा अगदी विनम्रपणे मी बाहेर जाण्यास नकार दिला."
>> चर्चेच्या शेवटपर्यंत मी तेथेच बसलेले होते. चर्चा झाल्यानंतर आम्ही हॉटेलला परतलो. आणि धन्यवाद म्हणून मी त्याला एक स्टीलचे छोट्याशा डुकरात डायट कोक टाकून त्याला पाठवले. यानंतर वीनस्टीनने वेळोवेळी शेफील्ड हिला या प्रोफेशनमध्ये टिकू देणार नसल्याच्या धमक्या दिल्या.


पुढील स्लाइड्सवर पाहा, हार्वे वीनस्टीनवर इतर हॉलिवुड अभिनेत्रींनी लावलेले आरोप...

 

बातम्या आणखी आहेत...