आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातापूर्वी इतकी सुंदर होती ही तरुणी, क्षणार्धात गमावले सर्व काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियातील नोव्होसिबिर्स्क शहरात राहणारी मारिया हिने जून 2016 मध्ये कायद्याची पदवी घेतली होती. पण, आज तिला आपण ग्रॅज्युएट झाल्याचे काहीच आठवत नाही. तिच्या आयुष्यातील 2 वर्षे डोक्यातून डिलीट झाले आहेत. आणि तिचे दुर्दैवही असे की ती आपल्या सभोवताल किंवा आपल्यामध्ये झालेले बदल सुद्धा पाहू शकत नाही. तिला आपल्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही. होय, ही दोन्ही छायाचित्रे एकाच मुलीची आहेत. फरक इतकाच की एक फोटो अपघातापूर्वीचा आणि दुसरा अपघातानंतरचा आहे. 

 

असा झाला अपघात...
- सायबेरियन टाइम्सच्या वृत्तानुसार, 20 ऑगस्ट 2016 रोजी मारिया (आता 23 वर्षीय) आपला प्रियकर आंद्रेची भेट घ्यायला जाणार होती. पण, ती 10 मिनिटे उशीरा पोहोचली. आंद्रे यावर प्रचंड संतापला होता. दोघांचे भांडणही झाले. मारियाला हा प्रकार नंतर तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितला.
- त्या दिवशी आंद्रे कारमध्ये आपल्या दुसऱ्या एका फ्रेंडसोबत होता. त्याने वेळीच मारियाला कारमध्ये बसण्यास सांगितले. मारिया येताच त्याने आपल्या राग व्यक्त केला आणि दोघांचे भांडण सुरू झाले. त्यात आंद्रेने गाडी स्टार्ट करताच स्पीड वाढवली आणि ताशी 80 किमीच्या वेगाने ती कार सिग्नल तोडून दुसऱ्या कारवर आदळली.
- या अपघाताच्या वेळी आंद्रे आणि फ्रेंड समोर बसले होते आणि एअर बॅगमुळे त्यांना काहीच झाले नाही. पण, मागे बसलेली मारिया गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

 

2 वर्षे स्मरणातून गायब, डोळेही गेले
- गंभीर जखमी अवस्थेत मारियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत ती कोमात गेली. 10 दिवसानंतर ती कोमातून बाहेर आली. पण, तिचे आयुष्यच बदलले. अपघाताचे ते काही सेकंद तर सोडाच तिला मागच्या दोन वर्षांत (2015-2016) नेमके काय झाले काहीच आठवत नाही. 
- ती पदवीधर होती. पण, डॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले तर आपण ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला आहोत असे तिने सांगितले. मारिया आधी कशी होती आणि आता कशी दिसते हे तिला तिचे मित्र-परिवार सांगतात. तिला काहीच फरक पडत नाही. कारण, पाहण्यासाठी तिच्याकडे आता दृष्टीच राहिली नाही.


प्रियकराने साथ सोडली
अपघात झाला तेव्हा प्रियकराने तिला दुसऱ्यांची मदत घेत रुग्णालयात आणले होते. काही दिवस तो तिची भेट घ्यायला यायचा. मात्र, नंतर त्याने फोन करणेही सोडून दिले. मारियाच्या पालकांनी अपघातासाठी त्यालाच जबाबदार धरले. तसेच कोर्टात जाऊन उपचाराचा खर्च आणि भरपाईची मागणी केली. पण, त्याने खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. एक अपघात आणि तिने आपले हसते खेळते आयुष्य, सौंदर्य, प्रियकर आणि त्या आठवणी सारे काही गमावले आहे. विविध सोशल मीडिया पेजवर मारियासाठी निधी उभा करण्याचे आवाहन केले जात आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मारियाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...