आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या क्रूरतेचा पुरावा आहे ही धक्कादायक PHOTO सिरीझ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होणारा अत्याचार या छायाचित्रांमधून स्पष्टपणे दिसून येतो. बांग्लादेशच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक नौका बुडाली होती. त्या बोटमध्ये रोहिंग्या मुस्लिम क्षमतेपेक्षा जास्त भरले होते. त्याचवेळी फोटोग्राफर दामिर सागोल्ज घटनास्थळी पोहोचले आणि ते भयंकर क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. रोहिंग्यांचे मृतदेह किनाऱ्यांवर आणताना आणि त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावताना त्यांनी स्वतः पाहिले आहे. त्यातच जोरदार पाऊस सुरू झाला आणि मृतदेहांना रात्रभर प्लास्टिकच्या शेडखाली ठेवण्यात आले होते. 

 

मृतदेह मोजणेही कठिण

मृतदेह इतके होते की ते मोजणे सुद्धा कठिण झाले. हे सगळेच म्यानमारमध्ये होणाऱ्या हिंसाचाराला घाबरून छोट्या बोटमध्ये भर-भरून आले होते. सर्वांनाच जिवाची भिती असल्याने क्षमतेचा विचार कुणीच केला नाही. इतके दूर आल्यानंतर ऐन बांग्लादेशच्या किनाऱ्यावर त्यांची बोट बुडाली. हे फोटो त्या फोटो सिरीझचा भाग होते ज्यांना नुकताच पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फोटो काढताना किंवा प्रतिक्रिया घेताना त्यापैकी कुणीही विरोध करत नव्हते. त्या सर्वांचे आयुष्य एका खुल्या पुस्तकाप्रमाणे होते. 


असा सुरू झाला संघर्ष...
- रॅखीन प्रांतात 25 ऑगस्ट रोजी पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात रोहिंग्या मुस्लिम युवकांनी कथितरीत्या एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यानंतर पोलिस आणि लष्कराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. 
- हिंसाचार तसेच लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईमुळे आता तेथील रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळ काढावा लागत आहे. ते सगळेच बांगलादेशच्या दिशेने निघत आहेत.
- पलायन करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाईच नव्हे, तर बौद्ध समुदायाकडून होणाऱ्या हल्ल्यांना सुद्धा एक मोठे कारण मानले जात आहे. ते राहत असलेल्या शेकडो गावांवर स्थानिक बौद्ध समुदायाचे हल्ले झाले आहेत. याच भितीने ते पलायन करण्यासाठी विवश आहेत. 
- रोहिंग्या मुस्लिम समुदाय म्यानमारचे मूळ निवासी नसल्याचे सांगत त्यांना बाहेर काढले जात आहे. भारतासह कुठल्याही इतर देशाने त्यांना शरण देण्यास स्पष्ट नकार दिला. म्यानमारच्या सुरक्षा रक्षकांवर सुद्धा त्यांच्या हिंसाचाराचे आरोप लावले जात आहे. मात्र, पोलिस आणि लष्कराने सांगितल्याप्रमाणे, रोहिंग्या समुदाय त्यांच्यावर हल्ले करत असल्याने सुरक्षा रक्षक प्रत्युत्तर देत आहेत.

 

कोण आहेत रोहिंग्या मुस्लिम?
- रोहिंग्या मुस्लिम प्रामुख्याने म्यानमारच्या अराकान प्रांतात वसलेला अल्पसंख्याक समुदाय आहे.
- त्यांना काही शतकांपूर्वी अराकन प्रांतात मोगलांनी वसवले होते. 1785 मध्ये म्यानमारच्या या प्रांतावर बौद्धांनी नियंत्रण मिळवले. त्यांनी हजारो रोहिंग्यांची कत्तल करून उर्वरीत रोहिंग्यांना इतरत्र हकलून दिले. 
- तेव्हापासूनच रोहिंग्या मुस्लिम आणि बौद्ध समुदायात हिंसाचार सुरू झाला.
अद्याप नागरिकत्व नाही.
- म्यानमारमध्ये गेल्या कित्येक शतकांपासून 10 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिम वास्तव्य करत आहेत. मात्र, म्यानमार सरकारने त्यांना अद्याप नागरिकत्व दिलेले नाही. 
- या लोकांना देशच नाही असे म्हटले जाते. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. 
- गेल्या कित्येक वर्षांपासून होणाऱ्या दंगलींमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या घरांना आग लावून नरसंहार केला जातो. 
- त्यापैकी काहींना बांगदेश आणि थायलंडमध्ये त्यांना तात्पुरत्या शिबीरांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. एकट्या बांगलादेशच्या सीमेवर 6 लाख रोहिंग्या मुस्लिम शरण घेऊन आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो

बातम्या आणखी आहेत...