आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवुड सुपरस्टार Jet Li च्या धक्कादायक फोटोंमुळे खळबळ, या रोगाने आहे ग्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - द वन, रोमिओ मस्ट डाय, किस ऑफ द ड्रॅगन, एक्सपेंडेबल्स अशा अंसख्या चित्रपटांच्या माध्यमातून हॉलिवूड गाजवणारे सुपर स्टार जेट ली यांचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. त्यांचे वय 55 वर्षे आहे. तरीही, या फोटोमध्ये ते 80 वर्षांचे वृद्ध दिसत आहेत. आपल्या आवडत्या चिनी-सिंगापोरियन सुपर स्टारचे हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  


या रोगाने आहेत ग्रस्त
जगभरात 'द वन' आणि 'दी एक्सपेंडेबल्स' या हॉलिवुड चित्रपट सिरीझसाठी ओळखले जाणारे जेट ली यांना 2010 थायरॉइड असल्याचे निष्पन्न झाले. हा थायरॉइड अतिशय गंभीर स्वरुपाचा होता. त्यांच्यावर उपचार झाले पण, औषधी अजुनही सुरूच आहेत. परिणामी त्यांनी व्यायाम आणि मार्शल आर्ट्स प्रॅक्टिस बंद केली. त्यांचे वजन वाढले आणि ते अधिक वयस्कर दिसायला लागले. 2013 मध्ये त्यांनी आपल्या रोगाचा खुलासा केला होता. पण, त्यावेळी परिस्थिती एवढी विकट नव्हती.


रोगावर काय म्हणाले जेट ली...
- 2013 मध्ये त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्या आजारावर खुलासा केला होता. "आता मी एक सामान्य माणूस आहे. अगदी तुमच्यासारखाच सामान्य माणूस. माझे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मी व्यायाम करून नियंत्रण सुद्धा मिळवू शकत नाही. चित्रपटांमध्ये मी असंख्य सुपर हिरोंच्या भूमिका साकारल्या असतील. पण, खऱ्या आयुष्यात मी सुपरहिरो नाही तर एक सामान्य माणूसच आहे."
- 2016 पासून त्यांच्या आरोग्यात सुधारणाही झाली. त्यांनी औषधोपचारासह ध्यानसाधना देखील सुरू केली. या दरम्यान त्यांनी हॉलिवुड चित्रपटांच्या ऑफर नकारल्या. तसेच मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले. आपण सध्या दानधर्म आणि इतर कार्यक्रमांसाठी वेळ देत आहोत असे त्यांनी सांगितले होते.

 

बातम्या आणखी आहेत...