आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - जुळ्यांच्या वयात किती अंतर असू शकते... काही मिनिटांचे, किंवा काही तासांचे... पण, ब्रिटनमध्ये असेही जुळे आहेत. ज्यांच्या वयात तब्बल 5 वर्षांचा फरक आहे. मॅनचेस्टर येथे राहणाऱ्या क्लेअर आणि बेन सेल्डन यांच्या जुळ्यांपैकी एक मुलगा 6 वर्षांचा आहे. तर मुलगी 1.5 वर्षांची आहे. वयात इतके अंतर असतानाही ते जुळे आहेत यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. पण, खरोखर हा चमत्कार कसा घडला हे आई क्लेअरने सांगितले आहे.
- मॅनचेस्टर येथे राहणारी क्लेअर आणि पती बेन यांना एक मुलगी होती, जी आता 10 वर्षांची आहे. ती 2 वर्षांची असताना तिला एक भाऊ किंवा बहिण द्यावी असा निर्णय त्या दोघांनी घेतला.
- पण, 2 वर्षे उलटल्यानंतरही क्लेअरला गर्भधारणा झाली नाही. यानंतर झालेल्या विविध चाचण्यांमध्ये क्लेअर सेडन हिच्या ओव्हरीत सिस्ट (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. तिला गर्भधारणा होऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.
- यानंतर डॉक्टरांनी कपलला आयव्हीएफच्या माध्यमातून फर्टिलिटी ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला. क्लेअर आणि बेनने संमतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्या एकाच ट्रीटमेंटच्या वेळी डॉक्टरांनी एकूण 8 एमब्रियो तयार केले. त्यापैकी एक क्लेअरच्या गर्भाशयात ठेवण्यात आले. त्यातून एप्रिल 2012 मध्ये जॉन या मुलाचा जन्म झाला.
- काही महिन्यानंतर डॉक्टरांनी उर्वरीत एमब्रियोचे काय करावे अशी विचारणा क्लेअर आणि बेनला केली. त्यांनी उर्वरीत एमब्रियोंपैकी एकावरून पुन्हा गर्भधारणा केली. त्यातून गतवर्षी एका मुलीला जन्म दिला. एकाच ट्रीटमेंटच्या वेळी दोन्ही एमब्रियो तयार झाल्याने ते जुळेच आहेत असे आईचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.