आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bukhari Murder: पाकमध्ये शिजला हत्येचा कट; कृत्य लश्कर ए-तोयबाचे -काश्मीर पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी हत्येचा कट पाकिस्तानात रचण्यात आला होता. तसेच हे कृत्य लश्कर ए-तोयबाचे होते असा खुलासा काश्मीरचे आयजीपी एसपी पाणी यांनी केला. यासंदर्भातील सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचे ते पुढे म्हणाले. हत्या प्रकरणात आरोपी दहशतवादी अजद अहमद मलिक, अनंतनागचा मुजफ्फर अहमद भट, सज्जाद गुल (पाकिस्तान) आणि नवीद जट यांची ओळख पटली आहे. नवीद गेल्या 5 महिन्यांपासून हरी सिंह रुग्णालयातून फरार आहे.

 

इफ्तारसाठी जाताना खून
बुखारी यांचा खून रमजान दरम्यान 14 जून रोजी झाला होता. लालचौक परिसरात त्यांच्या कार्यालयातून ते इफ्तार पार्टीला जात होते. त्याचवेळी बाइकस्वार दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यात बुखारी यांचे 2 सुरक्षा रक्ष सुद्धा मारले गेले.

 
गुल विरोधात येणार लुक आउट नोटिस
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सज्जाद गुल यानेच पाकिस्तानात बुखारी विरोधात कॅम्पेन सुरू केले होते. तो काश्मीरचा राहणारा आहे. तसेच मार्च 2017 मध्ये पाकिस्तानला पसार झाला होता. त्याच्या पासपोर्टशी संबंधित माहितीचा सुद्धा तपास केला जात आहे. गुलच्या विरोधात लवकरच लुक आऊट नोटीस जारी केले जाणार आहे. त्याला भारतात आणण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...