आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नॅपचॅटचे सीईओ स्पीगल यांनी रोज कमावले 11 कोटी;2017 मध्ये वार्षिक पॅकेज होते 4,150 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- अमेरिकेतील तंत्रज्ञान व सोशल मीडियातील आघाडीची कंपनी स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी गेल्या वर्षी विक्रमी कमाई केली. त्यांना एकूण ४,१५० कोटींचे पॅकेज िमळाले. म्हणजे रोज ११.३६ कोटी रुपये. गेल्या दहा वर्षांत एखाद्या सीईओची झालेली ही सर्वाधिक कमाई आहे. 

 

स्पीगल यांच्या कमाईचा मोठा भाग शेअरमधून िमळालेला आहे. गेल्या वर्षी स्नॅपचॅटची पॅरेंट कंपनी असलेल्या स्नॅप इंकची लिस्टिंग झाली होती. स्पीगल यांना ४,१४० कोटी रुपयांचे स्टॉक ऑप्शन मिळाले. वेतन व इतर भत्त्यांच्या रूपात १० कोटी रुपये कमाई झाली. विशेष म्हणजे यात वेतनाची रक्कम फक्त ६४ लाख रुपये आहे. 


स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेले सीईओ स्पीगल यांनी २०११ मध्ये स्नॅप इंक कंपनीची स्थापना केली होती. फोर्ब्जच्या २०१५च्या यादीत ते सर्वात कमी वयाचे अब्जाधीश म्हणून नोंद होते. (किमान ६,५०० कोटींची एकूण संपत्ती) सध्या स्पीगल यांची एकूण संपत्ती २५,३५० कोटी असून स्नॅप कंपनीचे गेल्या वर्षी मार्चमध्ये लिस्टिंग झाले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कायलीचे ट्विट... 

बातम्या आणखी आहेत...