आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडेलने केल्या इतक्या सर्जरी की नाकात हाड उरले नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चेहरा आणि बॉडी सुंदर करण्याच्या मोहापायी सर्जरीचे व्यसन लागल्यास काय होते याचे उदाहरण समोर आले आहे. ब्रिटनची टॉप मॉडेल आणि रियालिटी टीव्ही स्टार क्लो खानने आपल्या नाकाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिने आपल्या नाकात हाडच उरलेले नाहीत हे फॅन्सला दाखवले. तिच्या डॉक्टरांनी रविवारीच तिचे नाक रीकंस्ट्रक्ट करण्यासाठी आणखी एक सर्जरी केली. त्यामध्ये तिच्या कानातून कार्टिलेज काढून नाकाला सपोर्ट लावण्यात आला आहे.

 

कार्टिलेज म्हणजे काय?
- कार्टिलेज हाडाचाच एक प्रकार असला तरीही ते हाडांच्या तुलनेत अधिक लवचिक असतात. हाताने किंवा शरीराच्या हालचालीने ते फोल्ड करणेही शक्य असते. कार्टिलेज प्रामुख्याने कान आणि नाकात असतो. 
- नाकांच्या शस्त्रक्रिया तिचा आकार कमी आणि जास्त करण्याच्या नादात क्लो खानच्या नाकात हाड उरलेला नाही. 
- त्यामुळे, डॉक्टरांना तिच्या कानातील कार्टिलेज काढून नाकाला रिकंस्ट्रक्ट करण्यासाठी वापरावा लागला आहे. 
- क्लो खोन ब्रिटनच्या सिलेब्रिटी बिग ब्रदरमुळे प्रसिद्ध आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर सर्जरीपूर्वी आणि नंतर असे दोन्ही फोटो शेअर केले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्लो खानचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...