आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाने आताच मानले बलात्कार हा गुन्हा, मंजूर केला कठोर कायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1991 मध्येच या देशाने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. - Divya Marathi
1991 मध्येच या देशाने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.

इंटरनॅशनल डेस्क - आफ्रिका खंडातील देश सोमालीलँडने मंगळवारी प्रथमच बलात्कार विरोधी कायदा मंजूर केला. आतापर्यंत या देशात बलात्कार करणाऱ्यांना शिक्षेचा उल्लेखच नव्हता. एवढेच नव्हे, तर या अमानवीय कृत्याला या देशाने गुन्हेगारी सुद्धा मानलेले नव्हते. उलट बलात्कार ही एक सामाजिक समस्या मानली जात होती. तसेच पीडितेला आरोपीसोबत विवाहासाठी विवश केले जात होते. 

 

आता होणार 30 वर्षांची कैद
- नवीन कायद्यानुसार, आता एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास त्याला किमान 30 वर्षांची कैद होणार आहे. 
- सोमालीलँडचे संसदेतील सभापती बाशे मोहम्मद फरहान यांनी हा निर्णय ऐतिहासिक म्हटले आहे. बलात्कारासह सामूहिक बलात्काराच्या घटना सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांच्यावर नवीन कायद्याने अंकुश लागेल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली. 
- 1991 मध्ये सोमालियापासून वेगळा होऊ या देशाने स्वयंघोषित गणराज्य स्थापित केले. यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देश म्हणून मान्यता मिळालेली नाही. 
- काही दिवसांपूर्वीच ब्रिटिश माध्यम द इंडिपेन्डंट आणि बीबीसीने या देशात होणाऱ्या बलात्काराच्या मुद्यावर विशेष वार्तांकन करून जगाचे लक्ष वेधले होते. या देशातील दुष्काळाचा गैरफायदा घेत महिलांवर बलात्कार केले जात असल्याचे वृत्त समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...