आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पांच्या मृत्यूनंतर मुलाने विचारले, 'मला शाळेत कोण सोडणार?' मग घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिग्टन - अमेरिकेतील इंडियाना प्रांतात दोन आठवड्यांपूर्वी ऑन ड्युटी पोलिस अधिकारी रॉब पिट्स यांचा मृत्यू झाला. एका मुलाचा वडील राहिलेल्या या शहीद पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूवर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. समुदायात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या. याच दरम्यान शहीद पोलिस अधिकारी रॉब यांचा मुलगा पहिल्यांदा शाळेत जाणार होता. पहिल्या दिवशी शाळेपर्यंत सोडू असे प्रॉमिस त्याच्या वडिलांनी केले होते. ही गोष्ट जेव्हा त्याच्या वडिलांच्या सहकारी पोलिस अधिकाऱ्यांना कळाली तेव्हा ते भावूक झाले. यानंतर रॉब यांच्यासोबत काम केलेले 70 पोलिस अधिकारी युनिफॉर्ममध्ये त्या मुलाच्या घरी पोहोचले. 

 

तयार होऊन बाहेर पडला तेव्हा हैराण झाला डॅकोटा
> वडिलांच्या मृत्यूचा या डॅकोटा नामक छोट्याशा मुलाला मोठा फटका बसला होता. आपल्या आईशी बोलताना त्याने खूप एकटे वाटत असल्याचे सांगितले. सोबतच, मला शाळेत सोडण्यासाठी कुणीतरी येईल का अशी विचारणा केली. 
> यानंतर आईने रॉबच्या मित्रांना आणि कुटुंबियांना घरी भेटीसाठी बोलावले आणि त्या सर्वांनी मुलाचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत डॅकोटाला याची जाणीव नव्हती की त्याला शाळेत सोडण्यासाठी कोण येणार आहे. 
> जेव्हा तो शाळेत जाण्यासाठी तयार झाला तेव्हा त्याच्या घराबाहेर 70 पोलिस अधिकारी युनिफॉर्ममध्ये हात बांधून एका रांगेत उभे होते. शाळेत जाण्यापूर्वी त्यांनी डॅकोटाला वडील रॉब यांचा एक बिल्ला आणि टीशर्ट दिले. 
> त्यापैकीच एक अधिकारी लेस हम यांनी सांगितले, हा एक बंधूभावाचा प्रकार आहे. येथे आम्ही फक्त नोकरी करत नाही, तर नातेसंबंध जोडतो. आमची ज्या-ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही हमखास पोहचतो. शाळेत आपला पहिला दिवस डॅकोटा कधीच विसरणार नाही. इतके जंगी स्वागत, की शाळेच्या प्रिन्सिपल सुद्धा बाहेर येऊन डॅकोटाचे स्वागत करत होत्या. 
> डॅकोटाचे वडील रॉब गेल्या 16 वर्षांपासून पोलिस दलात काम करत होते. 4 मे रोजी ते आपल्या टीमसह एका हत्येच्या आरोपीला अटक करण्यासाठी पोहोचले होते. त्याच दरम्यान झालेल्या गोळीबारात रॉब शहीद झाले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, अंगावर शहारे आणणारे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...