आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - इंग्लंडच्या एका धनाढ्याने आपला 21 कोटींचा बंगला सेलवर काढला आहे. यासाठी ठेवण्यात आलेली स्पर्धा खास आहे. 10.50 पाउंड अर्थात जवळपास 900 रुपयांची फी देऊन कुणीही 'विन अ मिलियनेयर मॅन्शन कॉम्पेटिशन'मध्ये सहभागी होऊ शकतो. स्पर्धा जिंकणाऱ्याला रोल्स रॉयस कार, 50 हजार पाउंड कॅश आणि घरातील उपकरणे आणि साहित्यांचा सुद्धा मालक केले जाणार आहे.
काय आहे मालकाचा हेतू?
>> बंगला विक्रीसाठी लॉटरी सिस्टम ठेवल्याने एखाद्या नशीबवान ग्राहकाचे भाग्य उजळेल, त्याला आपले ड्रीम होम घेता येईल असा मालकाचा हेतू आहे.
>> हा बंगला डेव्हन येथील टिव्हरसन परिसरात असून त्याचे बांधकाम 1990 मध्ये करण्यात आले आहे. तसेच पहिल्यांदाच विक्रीवर काढला जात आहे.
>> या बंगल्यापासून 4 किमी अंतरावर मालकाचे नातू राहतात. हा बंगला विकून त्यांच्याकडे जाऊन राहण्याची त्यांची इच्छा आहे.
>> एवढेच नव्हे, तर बंगला स्पर्धेच्या माध्यमातून विकून मिळणारा पैसा सुद्धा मालक दानधर्मात लावणार आहे.
>> या बंगल्यातून सामान घेऊन जाण्याचीही आमची इच्छा नाही. त्यामुळे, कपडे, खासगी सामान आणि फॅमिली फोटोज वगळता काहीही घेऊन जाणार नाही असे मालकांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ऑफरची आणखी सविस्तर माहिती आणि Inside Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.