आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे दारुने खेळली जाते घातक 'होळी', असा असतो नजारा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रंगांचा उत्सव फक्त भारतातच नव्हे, तर हजारो किमी दूर स्पेनमध्ये सुद्धा साजरा केला जातो. मात्र, त्या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे, तेथे एकमेकांना दारुचे रंग लावले जातात. लाल रंगाच्या वाइनने एकमेकांना रंगवले जाते आणि डान्स पार्ट्या केल्या जातात. ला बटाला डेल व्हीनो असे या फेस्टिव्हलचे नाव असून ते दरवर्षी जून महिन्यात साजरे केले जाते. यात लोक वाइन पीत असतानाच एमकेकांना त्यामध्ये रंगवतातही... यासाठी लोक खास ड्रेस कोडमध्ये येतात. 

 

- हा उत्सव दरवर्षी जून महिन्यात स्पेनचे शहर हारो येथे आयोजित केल्या जातो. याला जगातील सर्वात मोठे वाइन फेस्टिव्हल असेही म्हटले जाते. 
- या उत्सवाची सुरुवात 1965 मध्ये झाली. तेव्हापासून दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक रिओजा वाइन एकमेकांवर टाकून जल्लोष साजरा करतात. 
- औपचारिकरीत्या या फेस्टिव्हलची सुरुवात 29 जूनच्या सकाळी होते. यात स्थानिकांसह पर्यटक सुद्धा पांढरा टॉप आणि गळ्यात लाल रुमाल घालून येतात. 
- औपचारिक सुरुवात जूनमध्ये होत असली तरीही त्याचा जल्लोष मार्चपासूनच दिसून येतो. 4 मैल दूरपर्यंत गर्दी असल्याने वाहनांना प्रवेश नसतो. लोकांना पायी चालून या स्पॉटवर यावे लागते. 
- या फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी ट्रकांमध्ये भर भरून वाइन आणली जाते. तसेच 75,000 लीटरहून अधिक वाइन एकमेकांवर फेकली जाते. याच फेस्टिव्हल दरम्यान लोक बुलफाइटची मज्जा देखील लुटतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या फेस्टिव्हलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...