आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश तेल संपन्न, तरीही जनतेची उपासमारी; कच-यात अन्न शोधण्यासाठी मजबूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिका आणि देशांतर्गत विरोधकांना झुगारून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा निकोलस मादुरो यांची निवड झाली आहे. त्यांना तब्बल 92.6 टक्के मते मिळाली आहेत. अमेरिका आणि विरोधकांनी या निवडणुकीला फौल घोषित केले आहे. नैसर्गिक साधन संपत्ती असतानाही हा देश गरीबीशी दोन हात करत आहे. पेट्रोल असूनही तो दुसऱ्या देशांना विकता येत नाही. साधन संपत्ती असूनही त्याची निर्यात करता येत नाही. अशा या देशाबद्दल आम्ही काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.


कच्च्या तेलाचे साठे असूनही गरीब
जमीनीत तेल असलेला प्रत्येक देश धनाढ्य असतोच असे नाही. लॅटिन अमेरिकन राष्ट्र वेनेजुएला त्याचेच एक उदाहरण आहे. या देशात पेट्रोल मिनरल वॉटरपेक्षाही स्वस्त आहे. मात्र, भयान आर्थिक मंदीला सामोरे जाणाऱ्या या देशातील जनता भुकेने तळमळत आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक असूनही येथील जनतेला दोन वेळचे जेवणही नशीबात नाही. कारण फक्त एवढेच, की या देशाने जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र अमेरिकेशी वैर घेतले आहे. या देशातील नेत्याला हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता म्हणत नानाविध प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. स्वतःचे तेल असतानाही हा देश ते कुणालाही विकू शकत नाही. या देशात शुद्ध पिण्याच्या पाण्याची किंमत 35 रुपये लीटर आहे. तर पेट्रोल अवघ्या 60 पैसे प्रति लीटर विकल्या जात आहे.


कचऱ्यात जेवण शोधतेय जनता
>> हा फोटो वेनेजुएलातील राजधानी कराकस येथील आहे. येथे अॅड्रियाना नामक महिला कचऱ्यात खाण्यासाठी काही तरी मिळेल का, याचा शोध घेत आहे. आपल्या 2 वर्षांच्या मुलीचे पोट भरेल एवढा पैसा देखील नाही असे अॅड्रियाना म्हणते. 
>> अॅड्रियाना दररोज आपल्या मुलीला घेऊन कचऱ्यात जेवण शोधण्यासाठी निघते. उष्ट्या फेकून दिलेल्या डब्यांमध्ये खाण्यासाठी काही शोधणारी ती एकटी नाही. अनेक घरांची हीच गत आहे. 
>> राजधानीतील रस्त्यांवर आणि गटारांमध्ये लोक धातू शोधताना दिसून येतील. धातू गोळा करून ते विकूण किमान एक वेळचे जेवण तरी मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. 
>> कचरा, गटार आणि नाल्यांमध्ये दिवसभर काही ना काही शोधत असल्याने कित्येक लोकांना डेंगू आणि इतर रोग जडले आहेत. अशात आजारी झालेल्यांना औषधी सुद्धा उपलब्ध होत नाहीत.


पैश्यांना मोलच राहिले नाही
>> गतवर्षी मार्च पासून आतापर्यंत वेनेजुएलाचे चलन दर 220 टक्क्यांनी घसरले आहे. देशातील सर्वात मोठे चलनी नोट 100 चे आहे. त्याची किंमत आता केवळ 0.04 अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. 
>> तेलाचे भांडार मोठे आहेत, मात्र शुद्धीकरण बंद असल्याने पेट्रोलचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्चे तेल प्रोसेस करून इतर देशांना देखील विकता येत नाही. 2014 पासून जगातही तेलाच्या किमती 50 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. त्याचा देखील फटका या देशाला बसला आहे. 
>> 1999 ते 2013 पर्यंत दिवंगत माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेज राष्ट्राध्यक्ष असताना चित्र वेगळे होते. देशात गरीबी तर कमी होतीच, देश आर्थिक विकासाच्या दिशेने जात होता. तरीही त्यावेळी सुद्धा शावेज यांचे तेल कंपन्यांवर पूर्ण नियंत्रण नव्हते.


यामुळे झाले असे हाल...
>> मार्च 2013 मध्ये वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेज यांचे गंभीर आजाराने निधन झाले. एप्रिल 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून उपराष्ट्राध्यक्ष राहिलेले निकोलस मादुरो राष्ट्राध्यक्ष बनले.
>> आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर सत्तेवर येणाऱ्या मादुरो पदावर विराजमान होऊन 4 वर्षे उलटली. यात देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. 
>> अमेरिकाविरोधी भाषणे, अमेरिकन भांडवलशाहीचा द्वेष आणि जाहीर टीकांमुळे या देशाचे आणि अमेरिकेचे संबंध बिघडले. परिणामी अमेरिकेने संबंध तोडून मादुरोचा हुकूमशहा असा प्रचार सुरू केला. 
>> विरोधी पक्षांनी हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेऊन सरकारी विरोधी निदर्शने केली. तसेच मादुरोवर अधिकारांच्या गैरवापराचा आरोप लावला. ठिक-ठिकाणी आंदोलने करून राजीनाम्याची मागणी केली. 
>> गतवर्षी एप्रिलमध्ये मादुरोंनी विरोधी पक्ष नेता हेनरिक्स कॅपरिलेस यांना 15 वर्षांसाठी कुठल्याही शासकीय-प्रशासकीय पदासाठी अपात्र ठरवले. यानंतर अमेरिकेने वेनेझुएलावर आर्थिक, व्यावसायिक आणि प्रवास निर्बंध लागू केले. त्यामुळे देश डबघाईला निघाला आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या देशातील दारिद्र्य दर्शवणारे आणखी काही फोटो...