आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेने हंबनटोटा बंदर दिले चीनच्या ताब्यात ! सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बंदर, 99 वर्षांचा करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंकेने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे हंबनटोटा बंदर शनिवारी आैपचारिकपणे चीनकडे सोपवले. श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी यानिमित्ताने संसदेत झालेल्या एका कार्यक्रमात करारामुळे आर्थिक उलाढाल वाढेल व पर्यटनाला गती येईल, असा विश्वास व्यक्त केला. ९९ वर्षांच्या करारावर हे बंदर चीनला देण्यात आले आहे.  


बंदर परिसरातील गुंतवणुकीच्या क्षेत्रावर आता चायना मर्चंट्स पोर्टची कंपनी हंबनटोटा इंटरनॅशनल पोर्ट ग्रुप व हंबनटोटा बंदर सेवा संस्थेसह श्रीलंकेच्या बंदर नियामक संस्थेचा सामायिक हक्क असेल. हंबनटोटा बंदराची पायाभरणी माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्या हस्ते करण्यात आली होती. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी याच वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या दौऱ्यादरम्यान बंदरासंबंधी चीनशी चर्चा केली होती. त्यानंतर जुलैमध्ये करारावर स्वाक्षरीदेखील करण्यात आली होती. सुमारे ७ हजार १५० कोटी रुपयांच्या (१.१ अब्ज डॉलर) करारांतर्गत हंबनटोटा बंदराचा ७० टक्के भाग चीनच्या आस्थापनेला दिला. चीनने पहिल्या हप्त्याच्या रकमेपोटी श्रीलंकेला १९५० कोटी रुपये दिले आहेत. चीनने दक्षिण चिनी सागरात आक्रमक भूमिका घेतली आहे. 

 

बंदरामुळे कर्जबाजारी  
श्रीलंकेने हंबनटोटा बंदराच्या विकासासाठी मोठे कर्ज घेतले होते. ते चुकते करण्यासाठी श्रीलंकेने त्याची भागीदारी विकली. विरोधी पक्षाने विक्रमसिंघे सरकारवर देशाची संपत्ती विकल्याचा आरोप केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...