आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sridevi Fan Following In Afghanistan During Shooting Of Her Film Khuda GawahSridevi Fan Following In Afghanistan During Shooting Of Her Film Khuda Gawah

श्रीदेवीचे नाव ऐकताच गोळीबार थांबवायचे अफगाणिस्तानचे अतिरेकी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्ये आहेत. अफगाणिस्तानात तर लोकच नव्हे, तर अतिरेकी सुद्धा तिच्यासाठी वेडे होते. अफगाणिस्तानातच श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'खुदा गवाह'चे शूटिंग झाले होते. श्रीदेवी अफगाणमध्ये शूटिंग करताना तेथे शांततेचे प्रतिक बनली होती. एवढेच नव्हे, तर अतिरेकी तिचे इतके वेडे होते, की तिचे नाव घेताच ते गोळीबार बंद करून इतके-तिकडे पाहायचे...

 

फेसबूक पेज Yadi Tu Kabul चा अॅडमिन शइम राहीने काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीचा चित्रपट 'खुदा गवाह' चे पोस्टर शेअर केले होते. तो तिच्या चित्रपटांवर एक क्लिप बनवण्यास इच्छुक होता. पण, तिच्या निधनाचे वृत्त ऐकूण तो अतिशय दुखी झाला. आणखी एक अफगाणी फॅन खातोल अबाकीने सांगितले, श्रीदेवी जेव्हा चित्रिकरणासाठी अफगाणिस्तानात आली, तेव्हापासूनच या देशात तिचे लाखो फॅन झाले. काबूलच्या अर्टल ब्रिजवर श्रीदेवीच्या चित्रपटाचा एक सीन शूट झाला होता. ती प्रत्यक्ष तेथे गेली नव्हती. तरीही आजही लोक श्रीदेवीमुळे त्या ब्रिजला भेट देतात. 

 

आणखी एक रंजक किस्सा...
श्रीदेवीसोबत अमिताभ बच्चन सुद्धा शूटिंगसाठी अफगाणिस्तानात असताना तेथे गोळीबार होणे नेहमीचेच होते. एका सीनसाठी अमिताभ बच्चन यांना तेथील पाक दर्गाह बुजकशी येथे चित्रिकरण करायचे होते. त्यावेळी बुजकशी येथे गोळीबार सुरू होता. तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला अहमदजई यांनी बिग बींच्या सुरक्षेसाठी आपले निम्मे सैनिक तेथे तैनात केले होते असे म्हटले जाते. 

बातम्या आणखी आहेत...