आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनपेक्षा एका वर्षाने मोठी होती सून, मुलाने थाटला होता 51 वर्षीय महिलेशी विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अलकायदा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या खात्म्याला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मृत्यूनंतर त्याचे भले मोठे कुटुंब जगातील विविध देशांमध्ये व्यापले आहे. ओसामाच्या कुटुंबात खरोखर किती माणसे होती याचा तंतोतंत आकडा उपलब्ध नाही. तरीही लादेनचा मुलगा उमर बिन लादेन संदर्भात नेहमीच वृत्त येतात. उमरने आपल्या वयापेक्षा 25 वर्षे मोठी असलेल्या ब्रिटिश महिलेसोबत संसार थाटला होता. त्याची पत्नी लादेनपेक्षा एका वर्षाने मोठी होती. 

 

अशी झाली भेट आणि लग्न
- उमरचा विवाह 2007 मध्ये झाल्याचे वृत्त ब्रिटिश मीडियाने समोर आणले होते. त्यावेळी 27 वर्षांचा असलेला उमरने 51 वर्षीय जेन हिच्याशी विवाह केला होता. 
- जेन फिलिक्स ब्राउन ब्रिटनच्या चेशायर शहरातून आहे. इजिप्तमध्ये सुट्टीवर फिरत असताना या दोघांची पहिली भेट झाली होती. 
- उमरच्या पत्नीने सांगितले होते, की दोघांनी एप्रिल 2007 मध्ये इस्लामिक पद्धतीने विवाह केला होता. लग्नासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तसेच नाव बदलून जीना महमूद असे केले होते. 
- लग्नाचे वृत्त समोर आल्याने कुटुंबियांची कुप्रसिद्धी केली जाईल अशी भिती होती. त्यामुळे, आपण ही गोष्ट लपवून ठेवली असे जेनने सांगितले. आपण प्रेमात होतो. त्यामुळे, या गोष्टीचाही विचार केला नाही की तो लादेनचा मुलगा आहे असे जेन सांगते. 


दोघांना वेगळे राहावे लागले
- लग्नानंतर उमर आणि जेन यांना वेगळेच राहावे लागले होते. जेन ब्रिटनच्या चेशायर तर लादेनचा मुलगा उमर कतारमध्ये राहत होता. 
- जेनने उमरसाठी ब्रिटिश व्हीसा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या फॅमिली बॅकग्राउंडमुळे ते अशक्य होते. 
- कित्येक दिवस एकमेकांपासून दूर राहूनही ते संपर्कात होते. तसेच एकमेकांना इंटरनेटवर संवाद साधून तासंतास गप्पा मारायचे.


असा मोडला विवाह
- दोघांनीही 2010 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. पण, एकानंतर एक 4 आयव्हीएफ ट्रीटमेंट फेल ठरले. 
- त्याचवेळी उमर आपल्या पत्नीला घटस्फोट मागत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये उठले होते. जेन सुद्धा म्हणाली होती, की उमरचे मानसिक संतुलन योग्य नाही. त्यामुळे, आपण उमरपासून वेगळे होण्याचा विचार करत आहोत. 
- त्यानंतर 2015 अचानक एक वृत्त समोर आले की दोघे आता खुशाल दुसऱ्या एका देशात एकत्रित राहत आहेत. पण, नेमके कुठे हे सांगण्यात आले नाही. पण, काही दिवसांतच कतारच्या माध्यमाने त्यांच्यात घटस्फोट झाल्याचे स्पष्ट केले. 
- जेनसोबत विवाह विवाह करण्यापूर्वी उमरने तब्बल 5 वेळा लग्न केले होते. जेनसोबत झालेला त्याचा तो सहावा विवाह होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या दोघांचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...