आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया व रशियन सैन्याचे घौउतामध्ये हल्ले सुरूच, 5 दिवसांत 95 मुलांसह 403 मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस-  सिरिया व रशियाच्या आघाडी सैन्याने घौउता व राजधानी दमास्कसच्या परिसरात सलग पाचव्या दिवशीही हवाई हल्ले सुरूच ठेवले. गेल्या पाच दिवसांत हिंसाचारात ९५ मुलांसह ४०३ जणांना प्राण गमवावे लागले. ७२ तासांत २२ रुग्णालये उद्ध्वस्त झाली आहेत. रविवारनंतर झालेल्या हल्ल्यातील जखमींची संख्या १५०० वर आहे. जखमींवर नीटपणे उपचार देखील होत नाहीत. सुदैवाने घौऊतामध्ये सर्वात मोठे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु जखमींची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पुरेसे डॉक्टर तसेच परिचारिका नाहीत. ३० दिवसांसाठी हल्ले थांबवण्यात यावे. त्यामुळे मुले तसेच महिलांना दिलासा मिळू शकेल, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केले आहे. घौऊता पृथ्वीवर नरक बनल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे. रशियाद्वारे सिरियात करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यात २०० हून जास्त प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती रशियाच्या एअरब्रोनचे माजी कमांडर व रशियाच्या संरक्षणविषयक समितीचे प्रमुख व्लादिमिर शॅमनोव्ह यांचे म्हणणे आहे.

 

मुलांना घेऊन लोक सैरावैरा पळू लागले..

 

हिंसाचारात सर्वात वाईट स्थिती मुलांची झाली आहे. अनेक नागरिक आपल्या मुलांना घेऊन सैरावैरा धावताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या जारी एका व्हिडिआेत हे विदारक चित्र पाहायला मिळाले. व्हिडिआेत मुलांना पांघरुणात लपेटून ट्रकमधून घेऊन जाताना दिसतात.

 

 

अँगेला मर्केल यांचे आवाहन
जर्मन चान्सलर अँगेला मर्केल यांनी सिरियातील नरसंहार थांबवण्याचे आवाहन केले. मुलांची हत्या करणे आणि रुग्णालयांना नष्ट करणे नरसंहार आहे. जगभरातून त्यावर एका सुरात टीका व्हायला हवी, असे मर्केल म्हणाल्या.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...