आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या ओसाका प्रांतात 6.1 तीव्रतेचा भूकंप, किमान 3 जणांचा मृत्यू, वाहतुकीचा खोळंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोक्यो - पश्चिम जपानमध्ये सोमवारी सकाळी 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. यात 3 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. यात एकूण जीवित आणि वित्तहानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, भूकंपाचा केंद्रबिंदू ओसाका प्रांतातील उत्तरेकडे होता. सद्यस्थितीला सुनामीचा इशारा देण्यात आला नाही. या धरणीकंपाने ओसाका प्रांतातील ट्रेन, हवाई आणि रस्ते वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. 


क्योदो न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या झटक्यांमुळे ओसाका येथील स्वीमिंग पूलच्या शेजारची भिंत कोसळली. यात 80 वर्षीय वृद्धासह एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान कार्डिअॅक अॅरेस्टने आणखी एकाचा मृत्यू झाला. कान्साई इलेक्ट्रिक पॉवरने सांगितल्याप्रमाणे, भूकंपानंतर मिहामा आणि ताकाहामा अणु संयंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे बिघाड झाले नाहीत. तरीही खबरदारीसाठी जवळपासच्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे, जवळपास पावणे दोन लाख लोकांना याचा फटका बसला.

 

प्रशासन झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करत आहे. परंतु, नागरिकांचे संरक्षण आपली पहिली जबाबदारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. जपानच्या हवामान आणि विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, ओसाका प्रांतात 1923 नंतर आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. उल्लेखनीय बपाब म्हणजे, 11 मार्च 2011 रोजी जपानच्या पूर्व किनाऱ्यावर 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात 18 हजार लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आलेल्या सुनामीने सर्वात जास्त नुकसान झाले. फुकुशिमा न्यूक्लिअर पॉवर प्लान्ट उद्ध्वस्त झाले. त्याची झळ आजही जपान सोसत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...