आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पच्या सहकाऱ्याचे रशियाशी दृढ संबंध; कार्टर पेज यांच्यामुळे खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेसिमो केलेब्रेसी, अलाना अब्रेमसन- डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानादरम्यान सल्लागार असलेले कार्टर पेज त्या वेळी म्हणत, त्यांचा क्रेमलिनमध्ये प्रभाव आहे. ऑगस्ट २०१३ चे एक पत्र टाइमला मिळाले. यात पेज लिहितात, ६ महिन्यांपूर्वीपर्यंत ते क्रेमलिनमध्ये अनौपचारिक सल्लागार म्हणून राहत होते. हे पत्र सार्वजनिक झाले आहे.  


या पत्रामुळे प्रश्नांचे मोहोळ उठले. पेज यांचे संबंध रशिया सरकारशी कोणत्या पातळीवर आहेत? ट्रम्प यांनी मार्च २०१६ मध्ये आपल्या प्रचारादरम्यान पेज हे परराष्ट्र धोरण सल्लागार असतील असे म्हटले होते. यासंबंधी रिपब्लिकनच्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे प्रमुख डेव्हिन नन्सने मेमो जारी केला. कार्टर पेज यांच्या क्रेमलिनशी संबंधांना पुरावे म्हणून सादर करत त्यांनी डेमोक्रॅट्सची हेरगिरी केल्याचे म्हटले आहे. एफबीआयने परदेशी गुप्तचर निगराणी कोर्टाला हे सांगितले होते की, कार्टर पेज हे रशियन एजंट आहेत, असा दावाही केला आहे. या मेमोमध्ये ब्रिटिश हेर क्रिस्टोफर स्टील यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, ब्यूरोला कोर्टाने पेजची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. क्रिस्टोफर स्टील हे हिलरी क्लिंटनचे निकटवर्तीय आहेत. त्यांना हिलरींच्या प्रचारासाठी पैसा दिला होता. डेमोक्रॅट्सनी या मेमोविषयी आक्षेप घेतला. एफबीआयने इशारा दिला की, अपूर्ण व भरकटवणारा मेमो आहे. ब्रिटिश हेर स्टीलच्या कागदपत्रांमध्ये दिलेल्या माहितीतून स्रोत समजत नाहीत. पेज यांनीदेखील आरोपांचा इन्कार केला आहे. पेज यांच्यासारखे शक्तिशाली सल्लागार जनतेच्या समोर येण्याचा हा पहिला प्रसंग नाही.  
पेज यांच्यावरील संकट मॉस्कोमध्ये जानेवारी २०१३ मध्येच सुरू झाले होते. तेव्हा त्यांची भेट रशियन राजदूत व्हिक्टर यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झाली होती. न्यायालयीन कागदपत्रांनुसार या भेटीनंतर ३ महिन्यांनी व्हिक्टर एजंट म्हणून कोणालातरी भरती करण्याच्या प्रयत्नांत होते. याची आेळख ‘मेल-१’ म्हणून करण्यात आली. रशियन व्यापार प्रतिनिधी म्हणून ते संपर्क स्थापित करू शकतील. पेज तेव्हा रशियात सल्लागार म्हणून स्थिरावण्याचा प्रयत्न करत होते. टाइमला पाठवलेल्या संदेशात त्यांनी सांगितले- २०१३ दरम्यान त्यांनी जगातील काही लोकांसह गोलमेज बैठका घेतल्या.  


पेज यांनी रशियनांसह २०१३ मध्ये केलेल्या चर्चांची तपासणी एफबीआय करत आहे. त्या वेळी जूनमध्ये पेज यांनी काही ब्यूरो एजंट्च्या मुलाखतीदेखील घेतल्या होत्या. यात रशियाशी असलेल्या संबंधांचा खुलासा केला होता. पेज यांनी त्या एजंट्सना सल्ला दिला होता की, त्यांनी बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी वेळ द्यावा. याच्या काही काळानंतर ब्यूरोने त्यांच्याविरुद्ध सुडाची कारवाई सुरू केली. एफबीआयशी भेट घेतल्यानंतर दोन महिन्यांनंतर पेज यांनी आपल्या पत्रात दावा केला की, एका पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी क्रेमलिनशी संबंध वाढवले होते.  रशियातील आर्थिक सुधारणांविषयी आपण सकारात्मक भूमिका ठेवावी, असे पेज म्हणत.

बातम्या आणखी आहेत...