आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत उशीरा पोहोचले विद्यार्थी, शिक्षक-प्राचार्यांनी बांधून केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओगुन - नायजेरियातील एका शाळेत प्राचार्य आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रॉसला बांधून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलांची चूक एवढीच की त्यांनी शाळेत येण्यासाठी थोडासा उशीर केला होता. विद्यार्थी शाळेत पोहोचले तेव्हा गेटवरच शिक्षक थांबले होते. त्या सर्वांनी मिळून या मुलांवर असा अत्याचार केला. विशेष म्हणजे, त्यांनी विद्यार्थिनींना सुद्धा सोडले नाही. मुलींना सुद्धा अशाच प्रकारे बांधून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


- पंच नायजेरिया वेबसाइटच्या वृत्तानुसार, साउथ-वेस्टर्न ओगुन प्रांतात ही घटना बुधवारी घडली होती. शाळेच्या रस्त्याने जात असलेला पोलिस कर्मचारी लिविनसने ही घटना पाहिली आणि रेकॉर्ड केली. 
- विद्यार्थी विद्यार्थिनींना बांधून शिक्षक त्यांना मारहाण करत असल्याचे त्याने पाहिले. यावर संतप्त होऊन लिविनस प्राचार्य अफोलयान जोसेफ यांच्याकडे गेले आणि त्या मुलांना सोडण्याची विनंती केली. 
- पण, प्रिन्सिपलने त्यांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच आम्हाला या मुलांना शिक्षा देताना कुणीच अडवू शकत नाही असेही सांगितले. एवढेच नव्हे, तर लिविनस त्या बांधलेल्या मुला-मुलींना सोडवण्यासाठी गेले तेव्हा प्रिन्सिपल समोर येऊन धडकला. त्यानंतर लिविनसने आपल्या इतर पोलिस सहकाऱ्यांना बोलावून प्राचार्य आणि दोन शिक्षकांना अटक केली.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...