आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात मतदार नोंदणी केंद्रावर हल्ला, 57 जण मृत्युमुखी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळ मतदार नोंदणी केंद्रावरील आत्मघाती हल्ल्यात ५७ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. मृतांमध्ये ८ मुले, २२ महिलांचा समावेश आहे. आत्मघाती हल्लेखोराने रविवारी सकाळी १० च्या सुमारास दश्त-ए-बारची भागातील या इमारतीच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट घडवला. इसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली . घटना शियाबहुल भागात घडली. 


 नोंदणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटानंतर दोन मजली इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यानंतर परिसरात अनेक मृतदेह पडल्याचे एका सोशल मीडियात पोस्ट झालेल्या फुटेजमध्ये दिसून येते. आगामी दोन महिन्यांत देशातील ७ हजारांवर मतदार नोंदणी केंद्रावर जास्तीत जास्त नोंदणी केली जाईल, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  


वास्तविक अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सरकार व तालिबान यांच्यातील वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे तालिबानवर संशय होता. मात्र तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांची सुरक्षा हे मोठे आव्हान असते. गेल्या आठवड्यातही एका मतदार नोंदणी केंद्रावर दहशतवादी हल्ला झाला होता. नोंदणी कार्यक्रम सुरू झाल्यापासून दोन पोलिसांचा मृत्यू झाला. त्याशिवाय तीन निवडणूक अधिकाऱ्यांसह ५ जणांचे अपहरण झाले आहे. अफगाणिस्तानात संसदीय तसेच जिल्हा परिषदेसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात पुढील पाच वर्षांसाठी २४९ सदस्यीय कनिष्ठ सभागृहासाठी मतदान होणार आहे.  

 

‘माझ्या मुली कुठेयत मला ठाऊक नाही..’  

मतदार केंद्रावर नाव नोंदणीसाठी आल्यावर स्फोटात जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याने प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. स्फोटात जखमी झाल्याने जायबंदी झालो आहे. माझ्या मुली सोबत होत्या. त्या कुठे आहेत मला ठाऊक नाही, अशा हतबल स्वरात त्यांनी भावना मांडल्या. सरकार आम्हाला सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहे, असे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले.   

 

ऑक्टोबरला निवडणूक  
अफगाणिस्तानात २० आॅक्टोबर रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार याद्यांची पडताळणी, नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांना मतदार आेळखपत्र देखील देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १४ एप्रिलपासून मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे.  

 

दोन दिवसांपूर्वी रॉकेट हल्ला  
पोलिसांनी बंडखोरांच्या विरोधात कडक मोहीम घेत मतदार नाव नोंदणी केंद्राला सुरक्षा देण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु राजकीय इच्छाशक्ती पाठीशी नसल्यामुळे शुक्रवारी बाडघिस प्रांतातील वायव्येकडील भागात दहशतवाद्यांनी रॉकेटने हल्ला केला होता. त्यात मतदार नाव नोंदणी केंद्रावरील एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक जण जखमी झाला होता. हा हल्ला तालिबानने केल्याचा आरोप आहे.  

 

पुढील स्लाईडवर पहा, आणखी फोटो.....

 

 

बातम्या आणखी आहेत...