आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या एलजींना वाटते मी सुपरमॅन; पण, कचऱ्याच्या समस्येवर गंभीर दिसत नाहीत -SC ने फटकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी पावले उचलले नसल्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांना फटकारले आहे. कोर्टाने सांगितले, आपण (एलजी) म्हणता की माझ्याकडे ताकद आहे मी सुपरमॅन आहे. एलजी कार्यालय कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गंभीर दिसत नाही. विशेष म्हणजे, ते स्वच्छतेशी संबंधित महत्वाच्या बैठकीत सुद्धा सहभागी झाले नाहीत. यावरून सुप्रीम कोर्टाने ही फटकार लावली आहे. तर दुसरीकडे, एलजी (उप-राज्यपाल) कार्यालयाकडून कोर्टात असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, की दिल्लीत कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची जबाबदारी तीन महानगरपालिकांची आहे. 


सुप्रीम कोर्टात यापूर्वी झालेल्या सुनावणीत 10 राज्य सरकारांना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट न केल्याबद्दल फटकारण्यात आले होते. कोर्टाने सांगितले होते, दिल्ली कचऱ्याच्या ढिगारात दाबल्या गेली, मुंबई पावसात बुडते आहे. परंतु, राज्य सरकार यासाठी काहीही करत नाहीत. जस्टिस एमबी लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीत केजरीवाल सरकार आणि उपराज्यपाल यांच्यात झालेल्या वादाचे उदाहरण सुद्धा दिले होते. खंडपीठाने एलजी आणि केजरीवाल सरकारला विचारले होते, एनसीआरमध्ये असलेल्या कचऱ्याचे तीन डोंगरांची (ओखला, भलस्वा आणि गाजीपूर) विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कुणाची आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...