आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियाच्या हवाई तळावर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले! 24 तासांपूर्वीच दिली होती धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सीरियात कथित रासायनिक हल्ल्यांच्या दुसऱ्याच दिवशी सीरियाच्या हवाई तळावर मिसाइल हल्ले करण्यात आले आहेत. सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी भल्या पहाटे झालेल्या या हल्ल्यात अनेक जण शहीद झाले. तसेच असंख्य जखमी आहेत. त्या सर्वांची आकडेवारी गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. एवढेच नव्हे, तर या मिसाइल हल्ल्यांसाठी सीरिया सरकार आणि मीडियाने अमेरिकेवर आरोप लावले आहेत. पण, अमेरिकेने सीरियाचे हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. 

 

24 तासांपूर्वीच रासायनिक हल्ला!
- सीरियन बंडखोरांचे शहर दूमा येथे रविवारी कथित रासायनिक हल्ला झाला. सीरियात कार्यरत पाश्चात्य संस्था व्हाइट हेलमेटने ट्वीट करून याची माहिती दिली होती. सोबतच, पीडितांचे फोटो पोस्ट करून या हल्ल्यात 70 जणांच्या मृत्यूचा दावा केला होता. 
- या हल्ल्यासाठी अमेरिकेसह विविध देशांनी सीरिया सरकारला जबाबदार धरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियावर आरोप केला. रशियाचे सीरियाला बिनशर्त समर्थन आहे. अर्थातच या रासायनिक हल्ल्यासाठी रशिया जबाबदार आहे असे ते म्हणाले होते. 

 

अमेरिकेने बदला घेतला?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी झालेल्या संशयित रासायनिक हल्ल्यासाठी सीरिया आणि रशियाला जबाबदार धरले होते. एवढेच नव्हे, तर ट्वीट करून या हल्ल्याचा सूड उगवणार अशी उघड धमकी सुद्धा त्यांनी दिली होती. 
- केवळ अमेरिकाच नव्हे, तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा सीरिया सरकारला रासायनिक हल्ल्याचा दोषी म्हणत बदला घेणार अशी धमकी दिली होती. या दोन्ही देशांनी दिलेल्या धमक्यांच्या दुसऱ्याच दिवशी सीरियाच्या एअरबेसवर मिसाइल हल्ले झाले आहेत. 
- सीरिया सरकार आणि रशियाने धमक्यांचा दाखला देत अमेरिका आणि फ्रान्सला मिसाइल हल्ल्यांसाठी जबाबदार धरले. पण, अमेरिकेने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...