आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातैपेई - तैवानच्या पूर्वेकडील प्रदेशात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाचा तडाखा बसला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल एवढी होती. घटनेत ७ जणांचा मृत्यू, तर २२५ लोक जखमी झाले. १४५ जण बेपत्ता आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मदतकार्याला वेग आला आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अद्यापही बाहेर काढण्यात यश मिळालेले नाही. २३६ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. भूकंपाचे हादरे १६० किलोमीटरवरील राजधानी तैपेईमध्येही बसले. लोकांना मंगळवारची रात्र उद्याने, शाळांच्या इमारती मध्ये काढावी लागली. लष्कराला पाचारण केले होत. भूकंपाच्या धक्क्यामुळे महामार्ग व पुलांचेही नुकसान झाले. ४० हजारांहून जास्त घरांचा वीज खंडित झाला आहे.
10 मजली बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकले लोक
अमेरिकन जिओग्राफिकल सर्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 नोंदवली गेली आहे. याचे केंद्र बंदराचे शहर हुआलिएन पासून 21 किलोमीटर अंतरावर जमीनीपासून आत 9.5 किलोमीटर होते.
- भूकंपाने हुआलिएन शहरातील मार्शल हॉटेलची 10 मजली बिल्डिंगचे ग्राऊंड फ्लोअर पडले.
- मीडिया रिपोर्टनुसार, या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली 30 लोक अडकले असण्याची शक्यता आहे.
- समुद्रकिनाऱ्यावर वसलेले तैवानचे हुआलिएन शहर हे प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहे. या शहराची लोकसंख्या 1 लाखांच्या आसपास आहे.
प्रेसिडेंट म्हणाले, बचाव आणि मदत कार्य वेगाने
- तैवान प्रेसिडेंट ऑफिसने जारी केलेल्या निवेदनानुसार, तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांनी कॅबिनेट आणि संबंधित मंत्रालयाला बचाव कार्य आणि मदत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारपासून भूकंपाचे 100 धक्के
- याभागात रविवार पासून भूकंपाचे 100 धक्के जाणवले आहेत. मात्र त्सुनामीचा इशारा दिलेला नाही. तैवानमधील तैइनान येथे दोन वर्षांपूर्वी एवढ्याच तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 100 जणांचा मृत्यू झाला होता.
- 1999 मधअये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप आला होता. 2400 लोक मृत्यूमुखी पडले होते.
रिश्टर स्केल
|
परिणाम
|
0 ते 1.9
|
केवळ सिज्मोग्राफवर माहिती मिळते.
|
2 ते 2.9
|
हल्के कंपन.
|
3 ते 3.9
|
एखादा ट्रक जवळून गेला तरी अशा स्वरुपाचे धक्के जाणवतात.
|
4 ते 4.9
|
खिडक्यांच्या काचा फुटू शकतात. भिंतींवरील फोटो पडू शकतात.
|
5 ते 5.9
|
अवजड फर्निचर हलू शकते.
|
6 ते 6.9
|
इमारतीच्या बिमला क्रॅंक्स पडू शकतात. वरच्या मजल्यांना नुकसान. |
7 से 7.9
|
इमारती कोसळतात. जमिनीच्या खालील पाईपला नुकसान.
|
8 ते 8.9
|
इमारतींसह अवाढव्य पूलही कोसळतात.
|
9 आणि यापेक्षा जास्त
|
संपूर्ण विध्वंस. जमिन झोकांड्या घालत असते. समुद्रात त्सुनामी येतात.
|
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.