आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याला पाठवला अश्लील मेसेज, मग मद्यपान करून बनवले संबंध; मिळाली ही शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास - अमेरिकेत एका 28 वर्षीय शिक्षिकेचे 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध उघड झाले आहेत. या प्रकरणी शिक्षिकेला 6 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे. तिने एकदाच नव्हे, तर अनेकवेळा आपल्या विद्यार्थ्याला घरी बोलावून सेक्स केल्याची कबुली दिली. त्यातही धक्कादायक म्हणजे, तिने गर्भवती असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. 


विद्यार्थ्याने केला खुलासा...
- 28 वर्षीय कॅथरीन रुथ हार्पर टेक्सासच्या डॅलास येथील रहिवासी आहे. ती जॉन एम टिडवेल माध्यमिक शाळेत 7 व्या वर्गातील शिक्षिका होती. 
- डेन्टन काउन्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिसने सांगितल्याप्रमाणे, तिला कोर्टाने सेक्शुअल अॅसॉल्ट आणि विद्यार्थ्यासोबत अवैध संबंध प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 
- कोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जेव्हा शालेय प्रशासनाने त्या विद्यार्थ्याकडे या शारीरिक संबंधांविषयी चौकशी केली, तेव्हा त्याने रडत-रडत सर्व काही सांगितले. तसेच आपल्या टीचरने सेक्ससाठी मजबूर केल्याचा खुलासा केला. 
- स्टार टेलिग्रामच्या वृत्तानुसार, पोलिसांनी कॅथरीनचे स्मार्टफोन जप्त केले. त्याचा तपास केला असता त्यामध्ये विद्यार्थी आणि टीचरचे असंख्य न्यूड फोटो सापडले आहेत. 
- विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याची ओळख जाहीर केली नाही. पण, तो माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आहे असे सांगितले जात आहे. 


अशी सुरू झाली चॅटिंग...
- शिक्षिका आणि विद्यार्थ्यात अश्लील टेक्स्ट मेसेज आणि न्यूड फोटोजच्या माध्यमातून चॅटिंग होत असल्याचे समोर आले आहे. याची सुरुवात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये झाली. तेव्हा ती विद्यार्थ्याच्या घरी गेली होती. दोघांनी आधी मद्यपान केले. यानंतर शारीरिक संबंध बनवले.
- स्टूडेंटने सांगितले, की जून-जुलै 2016 दरम्यान हे सर्व काही अनेक वेळा घडले होते. पोलिसांनी त्या मुलाचा फोन सुद्धा जप्त केला. त्यामध्ये या दोघांत 2 महिन्यांत 76 वेळा फोनर बोलणे झाले होते असे समोर आले. 
- गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. तेव्हा ती 8 महिन्यांची गर्भवती होती. त्यातही धक्कादायक म्हणजे, हे बाळ तिच्या पतीचे आहे, की विद्यार्थ्याचे हे तिला माहिती नाही. 
- तिला केवळ 6 वर्षांची शिक्षाच झालेली नाही, तर आयुष्यभरासाठी तिचे नाव सेक्स ऑफेंर्सच्या यादीत राहील. यापुढे तिच्या प्रत्येक हालचालीवर पोलिस लक्ष ठेवू शकतील. तसेच अल्पवयीनांच्या ती जवळ जाणार नाही असेच जॉब तिला दिले जातील.

 

बातम्या आणखी आहेत...