आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलीवर रेपनंतर विटांनी ठेचले; अशा अवस्थेत सापडला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डबलिन - आयरलंडमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एकपेक्षा अधिक नराधमांनी आधी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला विटा, दगड आणि काठ्यांनी ठेचून ठार मारले. सोमवारी (14 मे 2018) ती आपल्या दोन मित्रांबरोबर घराबाहेर पडली होती. पण, घरी परतलीच नाही. पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, तेव्हा जवळच्याच एका पार्कमध्ये तिचा मृतदेह निर्वस्त्र आणि विक्षिप्त अवस्थेत सापडला आहे. 


निर्वस्त्र विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह
> पोलिसांना पीडितेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारीच तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी एक मुलगा आला होता. हे दोघे दुसऱ्या एका मित्राची भेट घेणार होते. संध्याकाळी 5 च्या सुमारास घरून बाहेर पडताना तिने आपल्या आईला रात्री लवकर येणार असे सांगितले होते. पण, त्या रात्री ती घरी परतलीच नाही. 
> पालकांकडून तक्रार मिळताच शोध मोहिम सुरू करण्यात आली. त्यावेळी घरापासून काही अंतरावर एका फार्म हाऊसच्या गार्डनमध्ये निर्वस्त्र आणि विक्षिप्त अवस्थेत सापडला. आयरिश टाईम्स आणि द आयरिश सनच्या वृत्तानुसार, मृतदेह अतिशय विक्षिप्त अवस्थेत सापडला होता. 
> मृतदेहाची अवस्था इतकी वाइट होती की पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळ सील करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदन देखील करण्यात आले. त्यामध्ये या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. दगड, विटा आणि काठ्यांनी तिचा चेंदामेंदा करण्यात आला असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 
> सोबतच घटनास्थळावरून सापडलेल्या काही विटांवर रक्त लागलेला असल्याचे सुद्धा दिसून आले. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील काही विटा आणि काठ्या जप्त करून फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. विशेष म्हणजे, तिची आणि त्या दोन मित्रांची ज्या ठिकाणी भेट झाली, त्या पार्कपासून फक्त एका मैलवर तिचे मृतदेह सापडले आहे. 


त्या दोघांचीही चौकशी
पोलिसांना सर्वप्रथम त्या दोन मित्रांवर संशय आला. दोन्ही मित्रांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ते सुद्धा अल्पवयीन आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, तिची आणि या दोघांची संध्याकाळी भेट झाली होती. परंतु, भेट झाल्यानंतर आपण दोघेही घरी आलो. यानंतर ती कुठे गेली आणि कधी घरी परतली हे आपल्याला काहीच माहिती नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले. 


वयापेक्षा उंच, हुशार होती...
फॅमिली फ्रेंड आणि स्थानिक खासदार कॅथरीन मर्फी यांनी मुलीच्या दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सोबतच, आपण या मुलीला अगदी बाल्यावस्थेपासून ओळखत होतो. ती अतिशय गोड अशी मुलगी होती. आपल्या वर्गात आणि आपल्या वयाच्या मित्र मैत्रिणींमध्ये ती सर्वात उंच होती. अभ्यास आणि डान्ससह आपले छंद जोपासण्यातही ती अतिशय हुशार होती असेही त्या म्हणाल्या आहेत. पोलिसांचा तपास अजुनही सुरूच आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...