आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ यांच्या फायद्यासाठी सीमेवर तणाव, इम्रान खान यांचे मोदी-शरीफ मैत्रीवर प्रश्‍नचिन्‍ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण त्याच्या ११ दिवस आधीच पाकमधील प्रचार मोहिमेत भारत हा प्रचार मुद्दा बनला आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी त्याची सुरुवात केली. त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह लावले.

 

नवाझ शरीफ अडचणीत असतात तेव्हा सीमेवर तणाव वाढवण्यात येतो आणि दहशतवादी कारवायांतही वाढ होते. हा केवळ योगायोग समजायचा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इम्रान यांच्या पीटीआयने शरीफ तुरुंगात गेल्याच्या घटनेलाही मोदींशी जोडले. पीटीआयच्या प्रचार मोहिमेत ‘मोदी का जो यार है, गद्दार है, गद्दार है’ अशी घोषणा कार्यकर्ते करू लागले आहेत. दुसरीकडे मोदी-शरीफ ‘मैत्री’ वरील इम्रानचे ट्विट येताच भारतात राजकारण तापले.

 

‘नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाली आहे.त्यांचे चांगले मित्र पंतप्रधान मोदी या प्रकरणात काय बोलतात, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. ’
-इम्रान खान यांच्या ट्विटच्या २० तासांनंतर काँग्रेसने हे पोस्ट केले

 

भारतात बेलवर (जामीन) सुटलेल्यांनादेखील तुरुंगात पाठवायला हवे, असे पंतप्रधानच नव्हे, देश प्रत्येक नागरिकास वाटते.

- भाजपने जामिनावरील काँग्रेसच्या नेत्यांवर ट्विटद्वारे टीका केली आहे.

 

काँग्रेसच्या ट्विटवर भाजपने केला पलटवार- जामिनावर असलेल्यांनी तुरुंगात जायला हवे 

इम्रान खानने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानात पंतप्रधान मोदी यांची मुस्लिमविरोधी प्रतिमा करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत लाभ मिळवण्याचा त्यांचा उद्देश आहे. भारतात काँग्रेसला या ट्विटमुळे मोदींवर टीकेची संधी मिळाली.मोदींनी डिसेंबर २०१५ मध्ये पाक दौरा केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...