आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआबुजा - पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामधील एका शहरात दहशतवादी संघटना बोको हरमने ११० शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण केले. याबाबतची शक्यता अगाेदरच व्यक्त करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे दहशतवाद्यांनी अपहरण केले.
डापची भागात १९ फेब्रुवारी रोजी ११ त १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचे बोको हरमच्या दहशतवाद्यांनी सामूहिक अपहरण केले होते. २०१४ मध्ये चिबोक शहरातून २७६ विद्यार्थ्यांचे सामूहिक अपहरण झाल्यानंतर नायजेरियात बोकोहरमच्या कारवायांवरून जागतिक पातळीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. २०१५ मध्ये निवडणुकीच्या विजयाबरोबरच सत्तेवर आलेले राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुहारी यांनी माजी सत्ताधाऱ्यांवर सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर बोको हरमला पराभूत करण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. आता आपल्यावरदेखील आरोप केले जात आहेत. वास्तविक, अशा प्रकारचे आरोप आपण पूर्वी विरोधी पक्षावर करत होतो, असे बुहारी यांनी सांगितले. एका मानवी हक्कविषयक संस्थेचे नायजेरियाचे संचालक आेसाई आेजिगो यांनी आपल्या अहवालात नायजेरियातील वास्तव मांडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.