आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hollywood चित्रपटात दिसणार थायलंड फुटबॉल टीम रेस्क्यूचा थरार; 400 कोटींच्या बजेटची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडच्या थाम लुआंग गुहेत अंडर-16 फुटबॉल टीमच्या 17 दिवस जगण्या-मरण्याचा संघर्ष आणि त्यांना बाहेर काढण्याची मोहिम यावर हॉलिवूडपट येत आहे. यासाठी प्रसिद्ध चित्रपट 'गॉड्स नॉट डेड' बनवणाऱ्या प्योर फ्लिक्स स्टुडिओने पुढाकार घेतला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्टुडिओ 3 ते 6 कोटी अमेरिकन डॉलर (412 कोटी रुपये) खर्च करण्याच्या तयारीत आहे. थायलंडमध्ये राहणारे प्योर फ्लिक्स स्टुडिओचे सीईओ आणि सह-संस्थापक मिशेल स्कॉट यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची पत्नी सार्जंट समन कुननची मैत्रिण होती. या बचाव मोहिमेतच कुनन यांचा मृत्यू झाला.


स्कॉट यांनी सांगितल्याप्रमाणे, ते या मोहिमेत सामिल असलेले बचाव कर्मचारी, खलासी आणि गुहेत अडकलेल्या मुलांच्या पालकांच्या संपर्कात होते. प्योर फ्लिक्स स्टुडिओची संपूर्ण टीम या मोहिमेत लहान मुलांसाठी प्रार्थना करत होती. स्कॉट स्वतः 4 दिवस थाम लुआंग गुहेच्या बाहेर बचाव पथकाला मदत करत होते. 


जिद्दीला सलाम
मिशेल यांनी सांगितल्याप्रमाणे, चित्रपटाच्या माध्यमातून ते इतरांना मदत करत राहण्याचा संदेश देऊ इच्छित आहेत. या चित्रपटात दोन खलासींच्या मुख्य भूमिका असतील. त्यांनीच गुहेत सर्वप्रथम या मुलांना शोधून काढले होते. परंतु, अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांच्या रोलवर त्यांनी काहीही बोलणे टाळले. टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक मस्क यांनी या गुहेत अडकलेल्या मुलांसाठी छोटी पाणबुडी आणि मदत पाठवली होती.

 

बातम्या आणखी आहेत...