आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेड काढणाऱ्याला तरुणीने शिकवला असा धडा, आयुष्यभर विसरणार नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - थायलंडचे पट्टाया शहर जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दिवस असो की रात्र नेहमीच या ठिकाणी स्थानिकांसह परदेशींची रेलचेल असते. फूड स्टॉल असो वा नाइटलाइफ प्रत्येक बाबतीत येथे पर्यटकांचे लक्ष वेधले जाते. अशात काही कुबुद्धीचे पर्यटक त्याचा गैरफायदा घेतात आणि महिलांना टच तसेच अश्लील चाळे करतात. अशाच एका परदेशी पर्यटकाने गर्दीचा गैरफायदा घेत एका महिलेला नाजूक ठिकाणी टच केले. एकदा तर महिलेने लक्ष दिले नाही. पण, नंतर जेव्हा तिला हा प्रकार कळाला तिने चक्क ब्रूस ली चा अवतार घेतला.


हा व्हिडिओ 2016 चा असला तरीही सध्या पुन्हा व्हायरल होत आहे. त्यामध्ये थायलंडची एक महिला एका परदेशी पर्यटकाची धुलाई करताना दिसून येते. गर्दीचा गैरफायदा घेत अंगाला टच करत असताना तिने त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर त्याची इतकी धुलाई केली की अक्षरशः रस्त्यावर लोळवले. तिच्यासह इतर काही तरुणींनी सुद्धा त्याच्यावर हात साफ केला. पट्टायात पर्यटकांनी कसे वागावे यासाठी हा व्हिडिओ एक धडा मानला जातो. अखेर स्थानिकांपैकीच काही पुरुष मध्ये पडले आणि त्याला मारहाणीपासून वाचवले. वाचल्यानंतरही तो अक्षरशः रडत होता.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...