आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्शुअल हरॅसमेंट प्रकरणांत कंगाल झाला हा भारतीय योगगुरू, असे झाले हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अल्पवयीनांच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. स्पिरिचुअल गुरू असल्याचा दावा करणाऱ्या आसारामचा हा गुन्हा गंभीर असल्याचे कोर्टाने नोंदवले. भारताचाच एक योगगुरू सुद्धा लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमध्ये बरबाद झाला आहे. एकेकाळी 500 कोटींहून अधिकच्या संपत्तीचा मालक राहिलेला या योगगुरूकडे आता काहीच उरले नाही. बिक्रम असे त्या योगगुरूचे नाव असून त्याच्या विरोधात 2013 मध्ये त्याच्याच महिला वकिलांसह शीष्यांनी रेपचे आरोप लावले.


लैंगिक शोषणात बाजू मांडणाऱ्या वकिलावरच रेप
- बिक्रम विरोधात जेव्हा अटक वॉरंट जारी करण्यात आले. तेव्हा तो फरार झाला होता. पण, कोर्टाच्या आदेशावरून प्रशासनाने त्याची सर्वस्वी संपत्ती सील करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर पीडितांना भरपाई देत असताना आपण दिवाळखोर झालो असे त्याने जाहीर केले. 
- विक्रम चौधरीवर त्याची वकील मीनाक्षी जाफा बोडेन हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी कोर्टाने बिक्रम चौधरीला दोषी ठरवले होते. 
- 2013 मध्ये मीनाक्षीसह सहा महिलांनी विक्रम चौधरीवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले. कॅनडामधील जिल लॉवलरने पहिल्यांदा चौधरीवर बलात्काराचा आरोप केला होता.
- हॉट योगगुरु बिक्रम चौधरीला आपल्या महिला वकीलाला भरपाई म्हणून सहा कोटी रुपये (नऊ लाख डॉलर्स) देण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर बिक्रम अमेरिकेतून फरार झाला होता. 
- बिक्रम चौधरीने वकील मीनाक्षीचे अनेकदा लैंगिक शोषण केले. तिला हॉटेलच्या सुईटमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला. हॉट योगगुरुवरील जुन्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर मीनाक्ष‍ी बाजू मांडत होती.
- मीनाक्षीने हॉट योगगुरुवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर तिची जून 2013 मध्ये नोकरीवरून हकालपट्टी करण्‍यात आली होती.
- या प्रकरणी कोर्टाने योगगुरु विक्रम चौधरीला दोषी ठरवत त्याला पीडितेला सहा कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश‍ दिले होते.


कायम वादग्रस्त ब्रिकम चौधरी
- 70 वर्षीय भारतीय अमेरिकन बिक्रम चौधरी 'बिक्रम योग'चा संस्थापक आहे. तो संपूर्ण जगात हॉट योग गुरु नावाने प्रसिद्ध आहे.
- 220 देशांत त्याचे 720 योग सेंटर आहेत, जेथे बिक्रम योगा शिकवला जातो. एकट्या ब्रिटनमध्ये अनेक सेंटर आहेत. 
- त्याच्या फॉलोअर्समध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटनची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यासारखे अनेक हॉलिवूड, खेळ आणि पॉलिटिक्सच्या जगतातील हाय प्रोफाईल सेलिब्रिटीज सहभागी आहेत.
- बिक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचे आरोप नेहमीच होत आले आहेत.
- सन 2013 मध्ये त्याची वकिल मीनाक्षीसह सहा महिलांनी योग गुरु बिक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला होता. 
- तर, बिक्रमने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, त्याच महिला माझ्यावर प्रेम करतात. मी कोणावरही कधीही बळजबरी केली नाही.


पत्नीने दिला घटस्फोट
- त्याची पत्नी राजश्री सुद्धा फेमस योगा टीचर आहे, जिने बिक्रमवर रेपचे आरोप झाल्यानंतर वैतागून घटस्फोटासाठी अर्ज केला. 
- 32 वर्षाच्या लग्नानंतर राजश्री चौधरीने डिसेंबर 2015 मध्ये बिक्रम चौधरीविरूद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
- राजश्रीने बिक्रमच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टीतील आपला निम्मा हिस्सा मागितला होता.
- अखेर एप्रिल 2015 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. राजश्रीला पोटगी म्हणून बेवरली हिल्स आणि लॉस एंजिलिसचे घर सोबतच फेरारी, मर्सिडीज 550 आणि बेन्टले कार दिल्या गेल्याचे सांगितले गेले. 
- तसेच यानंतर राजश्री बिक्रम चौधरीवर कोणताही खटला दाखल करणार नाही, अशी त्यांच्यात तडजोड झाली.
- बिक्रम आणि राजश्री यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. 
- बिक्रमजवळ 720 पेक्षा अधिक योगा स्कूलसोबतच बेवरली हिल्स, लॉस एंजिलिस आणि होनोलुलूमध्ये प्रॉपर्टीज आहेत.
- यासोबतच त्याच्याकडे 43 लग्झरी कार्सचा अलिशान ताफा आहे, ज्यात रॉल्स रॉयस आणि बेन्टले सारख्या कार्स आहेत.
- सध्या, बिक्रम अमेरिका सोडून भारतात परतला असून त्याने लोणावळ्यात आपले बस्तान बसवल्याचे बोलले जाते.


काय आहे बिक्रम योग?
- बिक्रम चौधरी आपल्या फॉलोअर्सना 40 डिग्री सेल्सियस तापमानात योगा शिकवतात. तो याला 'हॉट योग' म्हणतो.
- त्याच्याजवळ वर्ल्डवाईड 650 स्टूडियोत हजारों फॉलोअर्स आहेत. 
- फोर्ब्सच्या माहितीनुसार, बिक्रम एका ट्रेनिंग सेशनला 10 हजार डॉलर तर पर्सनल ट्रेनिंगसाठी 20 हजार डॉलर घेतो.
- बिक्रम ऑक्टोबर 2015 मध्ये कॉपीराईट केस हारला होता. यात 26 पोज आणि तीन ब्रीथ एक्सरसाईजचा समावेश होता.


पुढील स्लाईड्सवर पाहा या वादग्रस्त योग गुरूचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...