आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदर तरुणींच्या या देशात शॅम्पू 6 लाखात, पेट्रोल प्रति लीटर 600

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - या देशातील सुंदर महिला साऱ्या जगात लोकप्रीय आहेत. या देशाने जगाला एक-दोन नव्हे, तर तब्बल 22 आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुंदरी दिल्या आहेत. त्यामध्ये 7 मिस युनिव्हर्स, 6 मि‍स वर्ल्‍ड, 7 मि‍स इंटरनॅशनल आणि 2 मिस अर्थ इत्यादींचा समावेश आहे. हा देश आणि दक्षिण अमेरिकेतील उत्तरेकडे वसलेला व्हेनेझुएला. पण, सद्यस्थितीला हा देश बकाल झाला आहे. अर्थव्यवस्था इतकी डगमगली, की लोकांना जेवण तर सोडाच पिण्याचे पाणी मिळवणेही कठिण झाले आहे. 


परिस्थिती इतपत बिघडली की या देशात एका शॅम्पूची बॉटल 6,60,862 बोलिव्हरमध्ये विकली जात आहे. बोलिव्हर येथील चलन आहे. त्याला शॉर्टमध्ये बीएस असे लिहिले जाते. भारताचा एक रुपया व्हेनेझुएलात 1000 बोलि‍व्हर असे गणित बनले आहे. चलनाचे मूल्य निच्च पातळीवर पोहोचल्याने येथील नागरिकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा पोत्यात भरून कॅश न्यावा लागत आहे. येथे पेट्रोलची किमत प्रति लीटर 670 बोलिव्हर अर्थात 67 पैसे आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, अशा आहेत येथील दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती...

बातम्या आणखी आहेत...