आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख काेटींच्या कंपनीच्या माजी अध्यक्षांनी दिली एंडिंग लाइफ पार्टी; म्हणाले- रुग्णालयात अंत नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- बांधकाम व खाणकामासाठींच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कोमात्सू या जपानी कंपनीसाठी सोमवारचा दिवस संस्मरणीय ठरला. कंपनीचे माजी अध्यक्ष व ८० वर्षीय उद्योगपती सोतारू अंजाकी यांनी ‘एंडिंग लाइफ पार्टी’ आयोजित केली. त्यात एक हजार लोक सहभागी झाले. शस्त्रक्रियेने कोणताही फायदा होणार नाही याची पित्ताशयाचा कर्करोग झालेल्या अंजाकींना जाणीव आहे. यामुळे त्यांनी उपचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अंजाकींनी या पार्टीसाठी गेल्या २० नाेव्हेंबरला वृत्तपत्रांत जाहिरात दिली होती. यात त्यांनी आपल्या ढासळत्या प्रकृतीचा उल्लेख करून जवळच्या लोकांना ‘एंडिंग लाइफ’ पार्टीत येण्याचे निमंत्रण दिले. कंपनीच्या टोकियातील मुख्यालयाजवळ हॉटेलात पार्टी ठेवली. त्याचा संपूर्ण खर्च केला.  गोल्फ आणि पर्यटनाची आवड दर्शवणारी अंजाकी यांची १०० वर छायाचित्रे पार्टीत दाखवण्यात आली. नंतर पत्र परिषदेत अंजाकी म्हणाले, ‘मी आयुष्यात पूर्णपणे संतुष्ट आहे.

 

माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचे ऋण कधीही विसरू शकत नाही.’ पार्टीत त्यांचे व्यावसायिक भागीदार, शाळकरी मित्र, सहकारी व गोल्फ क्लबचे सहकारी सहभागी झाले. अंजाकी १९९५ ते २००१ पर्यंत कंपनीचे अध्यक्ष होते.  कोमात्सूूचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सला कंपनीचा मुख्य व्यवसाय म्हणून विकसित केले. गतवर्षी कोमात्सूची उलाढाल १ लाख कोटी रुपये होती. फोर्ब्जने कोमात्सूला ‘सर्वाेत्तम नोकरी देणारी कंपनी म्हणून निवडले होते.

 

अंजाकी यांची सकारात्मक वक्तव्ये

आयुष्यात आलेल्या लोकांनी माझ्यासाठी काही ना काही केलेले आहे. त्या सर्वांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी एंडिंग लाइफ पार्टीचे नियोजन केले. {आता उरलेले क्षण रुग्णालयात वा साइड इफेक्ट सहन करत आयुष्याची अखेर करू इच्छित नाही. {‘माझे आयुष्य अानंदी व समाधानी राहिले, मग मृत्यू का दु:खदायी असावा? माझ्या मृत्यूनंतर दु:ख करत बसू नका, असे पार्टीतील सर्वांना सांगितले.’

बातम्या आणखी आहेत...