आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील एकमेव पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू, White Rhino प्रजाती विलुप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - National Geographic Creative - Divya Marathi
फोटो - National Geographic Creative

नायरोबी - जगातून डायनोसॉर प्रजातीचा अंत झाला तेव्हा माणसाला त्याची जाणीव नव्हती असे म्हटले जाते. पण, आधुनिक जगात इतका पुढारलेला असतानाही माणूस आणखी एका जनावराच्या प्रजातीचा अंत होताना फक्त पाहत होता. जगातील एकमेव अशा पांढऱ्या नर गेंड्याने केन्यातील अभायरण्यात शेवटचा श्वास सोडला. त्याच्या मृत्यूसह या पृथ्वीतलावरून व्हाइट ऱ्हायनो प्रजातीचाही अंत झाला आहे. 

 

केन्यातील ओआय पेजेटा अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी बुधवारी ही दुखद वार्ता जगाला दिली. सुदान असे नाव असलेला हा गेंडा 45 वर्षांचा होता. तसेच तो पृथ्वीतलावरील एकमेव मेल व्हाइट ऱ्हायनो होता. सोमवारपर्यंत तो व्यवस्थित होता. पण, वयोमानाने उद्भवलेल्या समस्यांमुळे मंगळवारी तो स्वतःच्या पायावर उभा देखील होऊ शकला नाही. डॉक्टरांनाही बोलावले पण, त्याची अवस्था अतिशय चिंताजनक असून तो कधीही जग सोडू शकतो असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याला काही वर्षांपूर्वीच झेक रिपब्लिकच्या अभयारण्यातून केन्यात आणले होते. झेक येथे तो जगात शिल्लक आणि जिवंत असलेल्या शेवटच्या दोन फीमेल व्हाइट ऱ्हायनोसोबत राहत होता. 

 

डोळे पाणावतील असा तो क्षण...
सुदानचा मृत्यू जवळ आल्याचे जेव्हा केनियन अभयारण्यातील कर्मचाऱ्यांना कळाले तेव्हा त्यांच्या डोळ्यात खरोखरच अश्रू तरळले. सुदान (व्हाइट नर गेंडा) डोळे अर्धवट बंद करून मृत्यूशय्येवर बसला होता. तेव्हा हळूच एकाने त्याला उब देण्यासाठी त्याच्या अंगावर एक शाल आणून ठेवली. तर दुसरा त्याच्या बाजूला बसून त्याला धीर देत होता. नॅशनल जिओग्राफिक क्रिएटिव्हने टिपलेला हे फोटोज पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. सुदानच्या जाण्याने साऱ्या जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नॅशनल जिओग्राफिकने टिपलेले त्याचे शेवटचे फोटो...