आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

102 इस्रायलींची सुटका करून शहीद झाले होते नेतन्याहूंचे बंधू, अशी होती मोहिम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. स्वतः लष्करात सेवा दिलेले नेतन्याहू यांचे मोठे बंधू जोनाथन उर्फ योनी यांच्या वीरमरणाच्या जगभरात गाथा आहेत. ऑपरेशन थंडरबोल्टमध्ये इस्रायलचा एकमेव कमांडो शहीद झाला होता. तेच नेतन्याहू उर्फ बिबी यांचे मोठे बंधू जोनाथन नेतन्याहू होते. 

 

> जून 1976 मध्ये पॅलेस्टीनी बंडखोरांनी एअर फ्रान्सचे एक विमान हायजॅक केले होते. त्यामध्ये क्रूसह 248 जण प्रवास करत होते. 
> विमान युगांडाच्या NTB विमानतळावर नेण्यात आले. दहशतवाद्यांना मदत करणारा युगांडाचा तानाशहा ईदी अमीनने इस्रायली वगळता सर्वांना सोडून दिले. 
> यानंतर आपल्या नागरिकांच्या सुटकेची जबाबदारी इस्रायल सरकारने जगातील सर्वात घातक गुप्तचर संस्था मोसादला दिली. 
> युगांडाच्या विमानतळावर नेमके कसे पोहोचणार यासाठी मोसादच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी ईदी अमीनच्या आवडीनिवडीचा अभ्यास केला. 
> एवढेच नव्हे, तर युगांडामध्ये कसे जाणार, सैनिक कसे खाली उतरवणार आणि प्रवाशांना घेऊन विमान परत इस्रायलला कसे आणणार याचे मॉक ड्रिल घेतले. 
> या मोहिमेसाठी मोसादने 100 कमांडोजची निवड केली. त्यामध्ये इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मोठे बंधू जोनाथन नेतन्याहू यांचाही समावेश होता. 
> इस्रायलमध्ये रिहर्सल केल्यानंतर मोसादचे 100 कमांडो युगांडाच्या दिशेने रवाना झाले. युगांडाचा हुकूमशहा महागड्या कारचा शौकीन होता. त्यामुळे विमानतळावर उतरण्यासाठी महागड्या कार आणल्याचा बहाणा केला.
> यात महत्वाचे म्हणजे, इस्रायली एजंट्सकडे फक्त युगांडामध्ये विमान लॅन्ड होईल इतकेच इंधन होते. परतण्यासाठी त्यांना इंधन गोळा करण्याचीही जबाबदारी होती.
> प्रत्यक्षात याच कारमध्ये इस्रायलचे सीक्रेट सर्व्हिस एजंट बसले होते. कारसह ते देखील विमानतळावर सुखरूप उतरले. 
> मोसादने 100 कमांडोजच्या तीन तुकड्या तयार केल्या होत्या. प्रत्येकाला वेग-वेगळी आणि अतिशय महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. 
> पहिल्या तुकडीने प्रवाश्यांना वाचवण्याची जबाबदारी सांभाळली. दुसऱ्या तुकडीने त्यांना कव्हर दिले आणि देखरेखीचे काम केले. तर तिसऱ्या टीमने परतण्यासाठी जेट फ्यूल आणि इतर व्यवस्था केली. 
> ही सगळीच मोहिम मोसादने फक्त 90 मिनिटांत पूर्ण केली. मात्र, इस्रायलचा एकमेव कमांडो आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला. तो कमांडोच नेतन्याहू यांचा भाऊ होता. 
> याच मोहिमेत मोसादने युगांडाचे 45 सैनिक ठार मारले. तसेच कुणीही पाठलाग करू नये याची देखील पुरेपूर खात्री घेतली. 
> इस्रायलने विमानतळावर लावलेले युगांडाचे सर्व 30 फायटर जेट नेस्तनाबूत केले आणि 102 प्रवाशांना घेऊन देशात परतले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या मोहिमेचे आणि योनी नेतन्याहू यांचे आणखी काही फोटोज...