आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीव सरकारचा दबाव; नऊ विरोधी पक्षनेत्यांच्या सुटकेचा आदेश मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो/ माले-  मालदीवमध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद व दुसरे न्यायमूर्ती अली हमीद यांना अटक करण्यात आली. यानंतर सर्वाेच्च न्यायालयातील उर्वरित न्यायमूर्तींनी सरकारसोबत संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांच्या सुटकेचे आदेश मागे घेतले आहेत. त्यांच्या दुरुस्ती आदेशात म्हटले की, राष्ट्राध्यक्षांची चिंता पाहता आपण आदेश मागे घेत आहोत. जुना आदेश मानण्यास सरकारने नकार दिला होता. सोमवारी सरकारने आणीबाणी लागू केली होती.


 विजनवासातील माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद यांनी सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताकडे राजनैतिक व लष्करी मदत मागितली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये नाशीद यांच्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने(एमडीपी) भारताकडे मदतीचे आवाहन केले. एमडीपीच्या निवेदनात नाशीद म्हणाले, भारत आपल्या दूतास लष्करासोबत पाठवून न्यायमूर्ती, राजकीय कैद्यासह माजी राष्ट्राध्यक्ष ममून अब्दुल गय्यूम यांची सुटका करावी. न्यायमूर्तींसह माजी राष्ट्राध्यक्ष ममून अब्दुल गय्युम यांनाही अटक केली आहे. ममून विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्यूम यांचे सावत्र भाऊ आहेत.नाशीद यांनी आणीबाणी घटनाबाह्य व बेकायदेशीर ठरवली असून सर्वांना ती मान्य न करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्ष यामीन अब्दुल गय्युम यांनी पायउतार व्हावयास हवे. विशेषत: अमेरिका व भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्याआधी सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राजकीय कैद्यांची सुटका व बडतर्फ १२ खासदारांचे सदस्यत्व बहाल करण्याचे आदेश दिले होते. सरकारने ते मान्य करण्यास नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...