आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांना कापून रस्त्यांवर फेकले, 100 दिवसांत मारले 10 लाख नागरिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रवांडा नरसंहारास आतापर्यंतच्या सर्वात भयंकर नरसंहारांपैकी एक मानले जाते. 1994 च्या एप्रिल महिन्यात झालेला हा नरसंहार 100 दिवस सुरूच होता. यात अख्ख्या देशात 10 लाख नागरिकांचा सामुहिक हत्याकांड झाला होता. हा हिंसाचार तुत्सी आणि हुतू समुदायांत झालेला जातीय संघर्ष होता. 

 

राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर उसळला नरसंहार
- 7 एप्रिल 1994 रोजी रवांडाचे राष्ट्राध्यक्ष हेबिअरिमाना आणि बुरंडिअनचे राष्ट्राध्यक्ष सिप्रेन यांची विमानात चढताना हत्या करण्यात आली होती. 
- त्यावेळी हुतु समुदायाची सत्ता होती तसेच त्यांचा खून तुत्सी समुदायाच्या गुन्हेगारांनी केली होती. राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी देशात हिंसाचार भडकला. हुतु सरकारचे सैनिकही या हिंसाचारात उतरले. त्यांना तुत्सी समुदायातील नागरिकांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. 
- अवघ्या काही दिवसांतच तुत्सी समुदायाच्या 80 हजार नागरिकांना मारण्यात आले. तर हजारोंच्या संख्येने तुत्सी नागरिक देश सोडून पसार झाले. 
- तरीही हा नरसंहार काही थांबला नाही. हुतु समुदाय आणि लष्करासह पोलिसांनी पुढचे 100 दिवस तुत्सी समुदायाच्या नागरिकांना शोधून-शोधून त्यांची निर्घृण हत्या केली. 
- या दोन्ही समुदायांमध्ये यापूर्वीही हिंसाचार उसळले होते. पण, एप्रिल 1994 च्या जातीय दंगलींनी कळस गाठला होता.


चिमुकल्या मुलांनाही रस्त्यांवर कापून फेकले
- या जातीय दंगल आणि हिंसाचाराने रवांडाला देश म्हणून उद्ध्वस्त केले होते. लाखो कुटुंब बरबाद झाले होते. स्थानिकांच्या मनात आजही त्या हिंसाचाराची भिती आहे. त्या नरसंहाराच्या आठवणी येताच ते स्तब्ध होतात.
- या हिंसाचारात प्रामुख्याने लहान मुले आणि महिलांना लक्ष्य करण्यात आले होते. असंख्य महिलांवर नागरिक आणि सैनिकांनी सामूहिक बलात्कार केले. 
- महिला-पुरुषांसह नराधमांनी चिमुकल्या मुला-मुलींनाही सोडले नव्हते. भर रस्त्यावर आणून त्यांचे तुकडे करून फेकताना त्यांना कुठल्याही प्रकारची दया-मया आली नाही. 
- तुत्सी समुदायाच्या पुरुष आणि लहानग्यांना ठार मारून फेकण्यात आले. तर महिलांची अब्रू आणि त्यांची घरे सुद्धा लुटण्यात आली. यानंतर घरातच मृतदेह आणि जखमींना फेकून आग लावण्यात आली होती. 


कित्येक महिला आजही आपल्या मुलांना स्वीकारत नाहीत
- नरसंहारात हत्या आणि बलात्कारांच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. 1994 च्या दंगलीत तुत्सी समुदायाच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के नागरिकांना मारण्यात आले.
- बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना इतक्या घडल्या की आजही हजारो महिला एचआयव्ही बाधित आहेत. तसेच हजारो महिला आपणच जन्म दिलेल्या मुलांना आपले मानत नाहीत. 
- त्यांच्या मते, ही मुले त्या सैतानाची औलाद आहेत ज्यांनी दंगलीत त्यांच्यावर बलात्कार केला होता. त्याच सैतानांनी त्यांच्या पती आणि मुलांसह घरांनाही आग लावली होती. या मुलांना पाहून महिलांना तो हिंसाचार आणि नराधमांचे चेहरे आठवतात.
- गेल्या काही वर्षांपासून देश त्या धक्क्यातून सावरत आहे. अनेक समाजसेवी संस्था येथे सामाजिक बांधिलकी आणि बंधुभाव वाढवण्यासाठी काम करत आहेत. 
- सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला यात पाश्चात्य देश सुद्धा मदत करत आहेत. त्यांच्याच मदतीने देशाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, बेल्जिअमनेच रवांडाला बनवले हिंसक जातीयवादी...

बातम्या आणखी आहेत...